शीश झुका कर अभिनंदन, भारतीय पायलटसाठी बॉलिवूडकरांची प्रार्थना

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील केलेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर, देशभरात संतापाची लाट आहे. त्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र हवाई दलाच्या कारवाईदरम्यान, भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. या पायलटला परत आणण्यासाठी देशभरात प्रार्थना सुरु आहेत. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून […]

शीश झुका कर अभिनंदन, भारतीय पायलटसाठी बॉलिवूडकरांची प्रार्थना
Follow us on

मुंबई : दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील केलेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर, देशभरात संतापाची लाट आहे. त्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र हवाई दलाच्या कारवाईदरम्यान, भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. या पायलटला परत आणण्यासाठी देशभरात प्रार्थना सुरु आहेत.

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर याचे उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने भारतात घुसून बॉम्ब हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय वायूसेनेने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याला पळवून लावले. मात्र भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या अडकला आहे.

संपूर्ण देश सध्या आपल्या पायलटला भारतात सुरक्षित आणावे यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावरही पायलटला देशात पुन्हा आणण्याची मोहिम राबवली जात आहे. या अभियानाला बॉलिवूड कलाकारांनीही साथ दिली आहे. कलाकारांकडून भारतीय पायलटला सुरक्षित भारतात आणावे यासाठी प्रार्थना केली जात आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही भारतीय पायलटसाठी प्रार्थना केली. यासोबतच तिरंग्याची इमोजी शेअर करत लिहिलं की, शीश झुका कर अभिनंदन…


अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय पायलटचा फोटो शेअर करत लिहिलं की,

यह असीम, निज सीमा जाने,

सागर भी तो यह पहचाने

ईस मिट्टी के पुतले मानव ने कभी न मानी हार,

तूफानों की ओर घुमा दो नाविक निज पतवार.

मी वायूसेनेच्या अधिकाऱ्यांना सलाम करतो. जगातील प्रत्येक ठिकाणी बसलेला भारतीय तुमच्यासोबत आहे. जय हिंद.


अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी लिहिलं की, भारतीय पायलटला देशात सुरक्षित परत आणावे यासाठी आम्ही प्रार्थना करतो.


अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी म्हटलं, पायलटचा व्हिडीओ शेअर करणे बंद करा. त्यांना सुरक्षित परत आणण्याची प्रार्थना करा. आपली वायूसेना पूर्ण तयार आहे. मात्र आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो.


आम्ही सर्वजण त्या पायलटसोबत आणि त्यांच्या परिवारासोबत आहे, तुमच्या शौर्याचा गर्व आहे, असं निर्माता, दिग्दर्शक करण जोहार यांनी म्हटलं आहे.


अभिनेत्री स्वरा भास्करने तीन हॅश टॅगसोबत BringHimHome #BringBackAbhinandan #Abhinandan ट्वीट केलं आहे. स्वरा व्यतीरिक्त निमरत कौरनेही बेपत्ता पायलटबद्दल प्रार्थना केली. तिने म्हटलं आहे की, “पायलटच्या परिवाराला साथ द्या. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत राहूया. अपेक्षा करते बहादूर पायलट लवकरच भारतात परतेल”.