मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा असल्याची धक्कादायक बाब फॉरेन्सिक तपासात उघड झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांच्याही अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. (Karan Johar Drug Party Video is true Revealed In Forensic Investigation)
या व्हिडीओनंतर करण जोहरने ही फक्त कौटुंबिक पार्टी होती. त्यात कोणतेही ड्रग्सचे सेवन झालेलं नाही, असे स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र दुसरीकडे काही कलाकार मंडळीनी करण जोहरच्या घरी होणाऱ्या पार्टीमध्ये सर्रास अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली गेली होती. त्या तपासणी अहवालात हा व्हिडीओ खरा असल्याचा उघड झालं आहे.
त्यामुळे आता करण जोहर अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण जोहरचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘धर्मा प्रोडक्शन’चे निर्माता क्षितीज प्रसादला अटक
सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला होता. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. नुकतंच धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद याची एनसीबीने चौकशी केली होती. जवळपास 27 तास त्याची कसून चौकशी केली गेली. त्यानंतरही झालेल्या चौकशीत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली.
क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याशिवाय क्षितीजच्या चौकशीदरम्यान त्याने अनेक मोठ्या नावांचाही खुलासा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.
अकाली शिरोमणी दलचे आमदार मजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत करण जोहरच्या पार्टीत ड्रग्जचं सेवन होत असल्याचा आरोप केला होता. ‘बॉलिवूडचे गर्विष्ठ तारे नशेची मिजास मिरवताना पाहा’ असं कॅप्शन देत सिरसा यांनी व्हिडिओ शेअर केला होता.
करण जोहर यांच्या पार्टीत अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, झोया अख्तर याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अर्जून कपूर, वरुण धवन, विकी कौशल, शाहिद कपूर, अयान मुखर्जीचा समावेश होता. पार्टीतील व्हिडीओमुळे कलाकारांच्या एक्सप्रेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
“त्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. आठवडाभर काम करुन दमल्यानंतर थोडा मोकळा वेळ घालवण्यासाठी ती पार्टी होती. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलतं सलतं काही घडत असतं, तर व्हिडीओ शूट करण्याइतपत मी मूर्ख आहे का?’ ‘ड्रग्जचं सेवन केलं असतं, तर आम्ही व्हिडीओ शेअर केला तरी असता का?’ असा प्रश्न करण जोहरने उपस्थित केला होता.
विकी कौशलने नेमकं त्याच वेळी नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढल्या. खरं तर विकीला डेंग्यू झाला होता, आणि तो तेव्हा कुठे बरा होत होता. तो गरम लिंबूपाणी पित होता. काही जण वाईन पित होते. व्हिडीओ काढण्याच्या पाच मिनिटं आधी माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक-सोशल पार्टी होती. आम्ही गाणी ऐकली, खाल्लं-प्यायलं. गप्पा मारल्या’ असेही करण म्हणाला होता. (Karan Johar Drug Party Video is true Revealed In Forensic Investigation)
संबंधित बातम्या :
बॉलिवूड कलाकारांसोबत ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने मौन सोडलं