मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वातले ड्रग्ज प्रकरण समोर आले. या प्रकरणात अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिच्यावरही ड्रग्ज पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी करिश्माने मुंबईच्या विशेष कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून करिश्मा गायब असून, तिच्या विषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. (Bollywood Drug Connection Deepika Padukone manager karishma Prakash missing from 4 days)
करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला गैरहजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे.
मंगळवारी (27 ऑक्टोबर) दिवसभर तिच्या घरी एनसीबीची कारवाई सुरु होती. घरात ड्रग्ज सापडल्यानंतर करिश्मा प्रकाश हिच्यावर तत्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला. एनसीबीचे अधिकारी करिश्माच्या घरी गेले तेव्हा ती घरात नव्हती. यानंतर अधिकाऱ्यांनी करिश्माच्या कुटुंबीयांकडे चौकशीसाठीचे समन्स देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे समन्स स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे समन्स करिश्मा प्रकाशच्या घराच्या दारावर चिकटवले. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून तिचा शोध सुरु आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. (Bollywood Drug Connection Deepika Padukone manager karishma Prakash missing from 4 days)
Narcotics Control Bureau raids residence of Karishma Prakash, manager of Bollywood actor Deepika Padukone, in Mumbai and seizes small quantity of hashish: Official
— Press Trust of India (@PTI_News) October 27, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर अशा अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली होती.
करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर होती. या दोघींमध्ये अमली पदार्थांविषयी देवाणघेवाण झाल्याचे मोबाईल चॅटस समोर आले होते. यानंतर एनसीबीकडून करिश्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांची चौकशी करण्यात आली होती.
एनसीबीने 25 सप्टेंबरला करिश्मा प्रकाश हिची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान करिश्मा प्रकाशने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. दीपिका पदुकोण ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअॅप ग्रूपची अॅडमिन असल्याचे तिने सांगितले होते. दीपिका पदुकोण हिनेदेखील चौकशीदरम्यान ही गोष्ट कबूल केली होती.
(Bollywood Drug Connection Deepika Padukone manager karishma Prakash missing from 4 days)