मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने समन्स बजावल्याने फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या प्रश्नांना ती कशाप्रकारे सामोरे जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिमॉन खंबाटासह श्रुती मोदी, रकुल प्रीत सिंग यांनाही आज (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र रकुलने आपल्याला समन्स न मिळाल्याचा बहाणा केला आहे. (Bollywood Drugs Case NCB Inquiry Live Update)
एनसीबीकडून आतापर्यंतच्या तपासात गोळा केलेले पुरावे, इतरांचे जबाब या सगळ्या गोष्टी सिमॉनसमोर ठेवण्यात येणार आहेत. या पुराव्यांच्या आधारावरच तिला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे सिमॉन खंबाटा एनसीबीच्या प्रश्नांना कशी उत्तर देणार आणि या चौकशी दरम्यान आणखी कोणाचे नाव समोर येणार, की नवीन माहिती उघडकीस होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mumbai: Fashion Designer Simone Khambatta arrives at Narcotics Control Bureau (NCB) office, for interrogation in connection with a drug case. pic.twitter.com/UJSHidmaLc
— ANI (@ANI) September 24, 2020
दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसात चौघींची चौकशी होणार आहे. (Bollywood Drugs Case NCB Inquiry Live Update)
सिमॉन खंबाटासह श्रुती मोदी, रकुल प्रीत सिंग यांनाही आज (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश आहेत. दीपिका सध्या गोव्यात चित्रीकरण करत असून, साराही आपल्या आई समवेत गोव्यातील घरी राहत आहे.
याआधीही अनेक वेळा श्रुती मोदीची चौकशी केली गेली आहे. श्रुती मोदी ही रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. श्रुती मोदीच्या या आधीच्या चौकशीच्या आधारावर अभिनेत्रींना प्रश्न उत्तरे केली जाणार आहेत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपास करण्यास सुरुवात केली होती. एनसीबी जसजशी खोलवर तपास करतेय, तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबीच्या चौकशीत मधु मांटेनाचे नाव घेतले होते.
एनसीबीकडून जया साहा, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. जया साहाची सोमवारीही 5 तास कसून चौकशी झाली आहे.
संबंधित बातम्या
एनसीबीच्या समन्सनंतर दीपिका सतर्क, चित्रीकरण थांबवलं, 12 वकिलांसोबत सल्लामसलत
ड्रग्ज कनेक्शन : दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा, रकुल यांना NCB चे समन्स!
(Bollywood Drugs Case NCB Inquiry Live Update)