मुंबई : ‘पहला नशा पहला खुमार’, ‘ए मेरे हमसफर’ सारख्या सुपरहिट गाण्यांचे गायक उदित नारायण आज (1 डिसेंबर) आपला 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. 90च्या दशकापासून उदित नारायण (Playback Singer Udit Narayan) यांनी आपल्या गाण्यांनी कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत. उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी सुपौल येथे झाला. उदित नारायण यांनी हिंदीसह तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत (Bollywood Playback Singer Udit Narayan Celebrating his 65th Birthday).
सुपौल येथे जन्मलेल्या उदित नारायण यांनी आपल्या करिअरची सुरुवात हिंदीमध्ये नव्हे तर, नेपाळी इंडस्ट्रीतून केली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात नेपाळ चित्रपट ‘सिंदूर’पासून केली. उदित नारायण यांनी नेपाळमधील एका रेडिओ वाहिनीमध्येही काम केले होते. त्यांनी रेडिओमध्ये स्टाफ सिंगरची जबाबदारी सांभाळली होती. याच काळात बॉलिवूडमधल्या एका गाण्याने त्यांचे नशीबच पालटले.
तब्बल 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर उदित नारायणचे पहिले सुपरहिट गाणे प्रदर्शित झाले. आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील त्यांनी गायलेले ‘पापा कहता है नाम करेगा’ हे गाणे प्रदर्शित होताच तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. या एका गाण्याने उदित नारायण यांचे आयुष्य बदलले. या गाण्यासाठी उदित नारायण यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. या गाण्याच्या प्रदर्शनानंतर त्यांच्याकडे कामांच्या अनेक ऑफरही येऊ लागल्या होत्या (Bollywood Playback Singer Udit Narayan Celebrating his 65th Birthday).
(Bollywood Playback Singer Udit Narayan Celebrating his 65th Birthday)
उदित नारायण नेहमी त्यांच्या गाण्यांसाठी चर्चेत असताच. परंतु काही काळापूर्वी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत आले होते. उदित नारायण यांचे दोन विवाह झाले होते. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण, तर दुसरी दीपा नारायण. उदित नारायण यांनी आपल्या पहिल्या लग्नाचा मुद्दा नाकारला होता. पण, नंतर जेव्हा रंजना अर्थात त्यांची पहिली पत्नी कोर्टात गेली, तेव्हा त्यांना हे लग्न स्वीकारावे लागले.
उदित नारायणची दुसरी पत्नी दीपा यांनाही एक मुलगा असून, त्याचे नाव आदित्य नारायण आहे. उदित नारायणप्रमाणे त्यांचा मुलगा आदित्यही बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक-अभिनेता आहे. आदित्यने बॉलिवूडची अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आदित्य नारायण त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. आदित्यच्या या सोहळ्याची आणि लग्न विधीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. योगायोग म्हणजे उदित नारायण यांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांचा मुलगा आदित्य विवाह बंधनात अडकणार आहे.
(Bollywood Playback Singer Udit Narayan Celebrating his 65th Birthday)