अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू

| Updated on: Oct 18, 2019 | 11:59 PM

अफगाणिस्तानमधील हसका मेना जिल्ह्यातील मशिदीत (Bomb blast in mosque of Afghanistan) झालेल्या स्फोटात जवळपास 62 जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू
Follow us on

काबूल : अफगाणिस्तानमधील हसका मेना जिल्ह्यातील मशिदीत (Bomb blast in mosque of Afghanistan) झालेल्या स्फोटात जवळपास 62 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिक शुक्रवारच्या नमाजासाठी आलेले असताना हा स्फोट झाला. स्फोट (Bomb blast in mosque of Afghanistan) इतका मोठा होता की त्यामुळे मशिदीचं छत थेट खाली आलं. त्यानंतर परिसरात चौफेर धुळीचे लोट उठले होते. यात 62 लोकांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले.

तालिबानच्या प्रवक्त्याने हा मोठा गुन्हा असल्याचं म्हणत या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा स्फोट घडवण्यामागे इस्लामिक स्टेट ग्रुप किंवा सरकारी शक्ती असल्याचा आरोप केला आहे.

स्फोट झाला त्यावेळी मशिदीमध्ये जवळपास 350 नागरिक उपस्थित होते, अशी माहिती स्थानिकांनी एका वृतसंस्थेला दिली आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानमधील हिंसा अस्वीकार्ह स्तरापर्यंत गेल्याचं म्हटल्यानंतर एकच दिवसानंतर हा स्फोट झाला. संयुक्त राष्ट्राने म्हटलं होतं, ‘अफगानिस्तानमध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात मोठ्या संख्येने नागरिकांचा जीव गेला आहे.’

जुलै ते सप्टेंबर या काळात 1,174 जणांचा मृत्यू झाला आणि 3,139 जण जखमी झाले आहेत. मागील वर्षाची तुलना करता यावेळच्या आकडेवारीत 42% टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्राने यात सर्वाधिक जबाबदार सरकारविरोधी तालिबानी गटाला धरले आहे. मागील 18 वर्षांपासून त्यांनी अफगाणिस्तानमध्ये हिंसा केल्याचाही आरोप तालिबानी गटांवर आहे.