Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

| Updated on: Jun 18, 2020 | 12:46 AM

दूरसंचार मंत्रालयाने BSNL ला चिनी कंपन्यांची उपयुक्तता कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं
Follow us on

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात (Boycott Chinese Equipment) संघर्षानंतर आता देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. तसेच, सरकारने दूरसंचार कंपनी बीएसएनलला चिनी उपकरणांचा वापर कमी करण्याचे आदेश दिले (Boycott Chinese Equipment) आहेत.

दूरसंचार मंत्रालयाचे BSNL ला आदेश

दूरसंचार मंत्रालयाने BSNL ला चिनी कंपन्यांची उपयुक्तता कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यतिरिक्त, दूरसंचार मंत्रालयाने खासगी कंपन्यांना नव्याने विचार करुन याबाबत ठाम निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

मंत्रालयाचे निर्देश काय?

– 4 जी सुविधेच्या अपग्रेडेशनसाठी कोणत्याही चिनी कंपन्यांनी बनविलेल्या उपकरणांचा वापर करु नये

– संपूर्ण निविदा नव्या पद्धतीने पुन्हा जारी करा

– सर्व खाजगी सेवा चालकांना चिनी उपकरणांवर अवलंबून असलेली कामं लवकरात लवकर कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Boycott Chinese Equipment

इंटरनेट कंपन्यांमध्ये चिनी कंपन्याची मोठी गुंतवणूक

भारताच्या जेवढ्याही मोठ्या इंटरनेट कंपन्या आहेत, त्यामध्ये चिनी कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात गुतवणूक केली आहे. आकड्यांनुसार, दूरसंचार उपकरणांचा बाजार 12 हजार कोटींचा आहे, यामध्ये चिनी उपकरणांचा शेअर जवळपास 25 टक्के आहे.

चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी

याशिवाय, खासगी मोबाईल सेवा ऑपरेटर्सने देखील लवकरात लवकर चिनी कंपन्यांच्या उत्पादनांची उपयुक्तता कमी करावी, यावर दूरसंचार विभाग (DoT) विचार करत आहे. कारण, चिनी कंपन्यानिर्मित नेटवर्क सुरक्षा उपकरणांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्याचबरोबर व्यापारी संघटना कॅटने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी आणि भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेने अशा 500 वस्तूंची यादी तयार केली आहे, ज्यांची मागणी चीनकडे करण्यात येणार नाही.

 

Boycott Chinese Equipment

संबंधित बातम्या :

India-China Face Off | भारताकडे सुखोई, अपाचे बोईंग, तर चीनकडे चेंगडू जे-20 आणि wz-10, कुणाकडे किती शस्त्रसाठा?

PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी