मुंबई : ब्राह्मी एक प्राचीन औषधी वनस्पती आहे. यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीचा औषधांसाठी हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. ही वनस्पती जमिनीवर पसरलेली आहे. या वनस्पतीवर पांढरा, गुलाबी आणि निळा इत्यादी अनेक रंगांची फुले उमलतात. या वनस्पतीचा प्रभाव थंड असतो. ही वनस्पती स्मृती सुधारण्यासाठी कार्य करते. आरोग्याच्या दृष्टीने या वनस्पतीचे बरेच फायदे आहेत. (Brahmi plant that makes the brain brilliant; Know other medicinal properties)
ब्राह्मीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. तसेच मन प्रसन्न राहून एकाग्रता वाढते. आपल्या स्मृतीशी संबंधित समस्या दूर करण्यात ब्राम्ही वनस्पतीचे खूप मोठी मदत होते. वृद्धांना बऱ्याचदा स्मरणशक्ती कमी होण्यास त्रास होतो. यावेळी या वनस्पतीचे सेवन करणे त्यांच्या स्मरणशक्तीच्या समस्येवर मोठा उपाय ठरू शकते. दूध आणि पाण्यात मिसळून ब्राह्मीची पावडर खाता येईल. याची आपले मन प्रफ्फुलित करण्यास मदत होईल.
ब्राह्मी कोर्टिसोलची पातळी कमी करते. तसेच तणाव आणि चिंता कमी करण्याचे कार्य करतात. कोर्टिसोल हा ताणतणावाशी संबंधित एक हार्मोन आहे. हे शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवून स्ट्रेसबस्टर म्हणून कार्य करते. यासाठी आपण ब्राह्मीच्या पानांचे चघळून सेवन करू शकता.
ब्राह्मी ही एक स्मृती वाढवणारी औषधी वनस्पती आहे. तसेच काही अभ्यासानुसार त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. मेंदूचे नुकसान करणारे पदार्थ काढून टाकण्यात ते मदत करतात. यामुळे अल्झायमर रोग टाळता येतो.
तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अँटी- ऑक्सिडंट्सचा समावेश करू शकता. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ब्राह्मी फ्री रेडिकल्सपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. त्यात अनेक पौष्टिक पदार्थ असतात. ते विविध रोगांशी लढायला मदत करतात. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
वेदना आणि जळजळ होण्यास मुख्य भूमिका निभावणाऱ्या सायक्लोजेनेसिस, कास्पासेस आणि लिपोक्सीजेनेस यांसारख्या एंजाइम्स रोखण्यास ब्राह्मी वनस्पतीची मोठी मदत होते. संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांसाठी ब्राह्मी वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे.
आपल्याला लांब केस हवे असल्यास आपण ब्राह्मी वापरू शकता. आपण आपल्या टाळूवर ब्राह्मी लावू शकता. यामुळे केसांचे उत्तम पोषण होते, तसेच केसांची गळती रोखली जाते. (Brahmi plant that makes the brain brilliant; Know other medicinal properties)
GST परिषदेच्या बैठकीत मोठी घोषणा, कोविडशी संबंधित वस्तूंवर 31 ऑगस्टपर्यंत आयात शुल्क माफ#GSTCouncilmeet #GSTMeeting #GSTmeet #NirmalaSitharaman #FMNirmalaSitharaman #COVIDrelatedequipmenthttps://t.co/PG6kIHzLiG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2021
इतर बातम्या
टाटांनी बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला थेट टक्कर