हेलिकॉप्टरने पाठवणी, शेतकरी बापाकडून मुलीची इच्छा पूर्ण

| Updated on: Feb 16, 2020 | 8:03 PM

मुलीच्या इच्छेखातर एका शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाची पाठवणी थेट हेलिकॉप्टरने (bridal farewell with helicopter) केली.

हेलिकॉप्टरने पाठवणी, शेतकरी बापाकडून मुलीची इच्छा पूर्ण
Follow us on

नांदेड : मुलीच्या इच्छेखातर एका शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाची पाठवणी थेट हेलिकॉप्टरने (bridal farewell with helicopter) केली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र या लग्नाची चर्चा सुरु आहे. शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने वरात आणि पाठवणी झाली. हे पाहण्यासठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शेतकरी नारायणराव कदम यांच्या मुलीचा आज लग्नसोहळा (bridal farewell with helicopter) पार पडला.

नारयण राव यांची मुलगी शिल्पा कदम हिचा विवाह हिंगोली जिल्ह्यातील उखळी गावच्या मोहन गायकवाड तरुणाशी झाला. आपल्या विवाहात हेलिकॉप्टरने वरात निघावी, अशी इच्छा शिल्पाची होती. ही इच्छा तिने वडील आणि भावाकडे बोलून दाखवली होती.

वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्नात हेलिकॉप्टर आणले. त्यानुसार कोंढा गावातून वधू-वराची वरात पिंपळगाव येथील मंगल कार्यालयापर्यंत आली. लग्न सोहळा झाल्यानंतर नवरदेवाच्या उखळी या गावापर्यंत नवरी-नवरदेवाची पाठवणी करण्यात आली. शिल्पाच्या या अनोख्या विवाहाची चर्चा सर्वत्र जिल्ह्यात सुरू आहे.

“मला अभिमान आहे, गर्व आहे की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. लहानपणा पासून माझी इच्छा होती की माझ्या लग्नाची वरात हेलकॉप्टरने निघावी. ती इच्छा वडील आणि भावाने पूर्ण केली. मला आज खूप आनंद होत आहे”, अस नवरी शिल्पाने सांगितले.