आमच्या घरी बाळ जन्मलं, ब्रिटीश पंतप्रधानांची घोषणा, 55 वर्षांचे बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा

| Updated on: Apr 29, 2020 | 5:21 PM

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी लंडनमध्ये मुलाला जन्म दिला (British Prime Minister Boris Johnson Partner Carrie Symonds gave birth to baby boy)

आमच्या घरी बाळ जन्मलं, ब्रिटीश पंतप्रधानांची घोषणा, 55 वर्षांचे बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा
Follow us on

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा झाले आहेत. जॉन्सन यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. ‘कोरोना’च्या उपचारानंतर ब्रिटीश पंतप्रधान नुकतेच बरे झाले झाले आहेत. (British Prime Minister Boris Johnson Partner Carrie Symonds gave birth to baby boy)

32 वर्षीय कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या रुग्णालयात सुदृढ बाळाला जन्म दिला, अशी घोषणा बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्याने केली. कॅरी सायमंड्स यांच्या गरोदरपणाविषयी सुरुवातीला गुप्तता बाळगण्यात आली होती.

बोरिस जॉन्सन ‘कोरोना व्हायरस’च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात रुग्णालयात दाखल होते. त्यांना तीन दिवस अतिदक्षता विभागातही ठेवण्यात आले होते. जॉन्सन यांना कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. 27 मार्चला तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. बरे झाल्यानंतर जॉन्सन यांनी कामाला सुरुवात करुन काही दिवस उलटत नाहीत, तोच ही ‘गुड न्यूज’ ब्रिटीश जनतेला मिळाली.

“लंडनच्या हॉस्पिटलमध्ये आज सकाळी निरोगी बाळाला जन्म दिल्याची घोषणा करताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मिस कॅरी सायमंड्स अत्यंत आनंदी आहेत” असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा

बोरिस जॉन्सन याआधी दोनवेळा विवाहबद्ध झाले आहेत. दुसरी पत्नी मरिना व्हीलर यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत. मात्र व्हीलर आणि बोरिस जॉन्सन 2018 मध्ये विभक्त झाले.

2019 च्या सुरुवातीपासूनच जॉन्सन यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या कॅरी सायमंड्स यांच्यासोबत डेटिंग करण्यास जाहीररित्या सुरुवात केली. मे महिन्याच्या सुरुवातीला आपण आई होणार असल्याचं सांगत लवकरच लग्न करणार असल्याचंही कॅरी यांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं. गेल्या वर्षीच्या अखेरीस दोघांनी एंगेजमेंट केल्याचंही बोललं जातं.