वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

| Updated on: Sep 22, 2019 | 11:55 AM

पाश्चिमात्य पद्धतीनुसार 'मधलं बोट' अर्थात 'मिडल फिंगर' दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं. मात्र दिल्लीतील दीराने आपल्या वहिनीलाच मिडल फिंगर दाखवत तिचा विनयभंग केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे.

वहिनीला मधलं बोट दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास
Follow us on

नवी दिल्ली : वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवणं दिल्लीकर दीराला (Middle Finger to Sister in Law) चांगलंच महागात पडलं आहे. अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून दिल्लीतील कोर्टाने आरोपी तरुणाला तीन वर्षांचा कारावास सुनावला आहे.

महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तरुणाने अश्लील हावभाव करुन ‘मधलं बोट’ दाखवल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. तीन वर्षांच्या तुरुंगवासासोबतच तरुणाला कोर्टाने दंडही सुनावला आहे. महानगर दंडाधिकारी वसुंधरा आझाद यांनी निकाल सुनावलाय

पाश्चिमात्य पद्धतीनुसार ‘मधलं बोट’ अर्थात ‘मिडल फिंगर’ (Middle Finger to Sister in Law) दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं.

21 मे 2014 रोजी पीडित वहिनीने आरोपीविरोधात तक्रार केली होती. दीराने अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवलं आणि आक्षेपार्ह भाष्य केलं, असा दावा तिने तक्रारीत केला होता. त्यासोबतच त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही महिलेने केला होता. तपासानंतर पोलिसांनी कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला.

लग्नानंतर चौथ्या दिवशी नववधूचा फोटोग्राफरसोबत पोबारा

मालमत्तेवरुन सुरु असलेल्या वादातून वहिनीने खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा तरुणाने केला होता. आपल्या बहिणीला त्याने साक्षीदार म्हणून कोर्टात उभं केलं. घटना घडल्याचा दावा केला जात आहे, त्यादिवशी आपला भाऊ वहिनीच्या घरी गेलाच नसल्याचं बहिणीने कोर्टात सांगितलं होतं.

संपत्तीवरुन आपल्या कुटुंबात कोणताच वाद नसल्याचं पीडितेने सांगितलं. तशाप्रकारचे पुरावेही कोर्टाला मिळाले नाहीत. विशेष म्हणजे महिलेच्या चेहऱ्यावरील जखम केसला बळकटी देणारी ठरली.

तक्रारदार महिलेचे आरोप खोडून काढणारे पुरावे नसल्याचं कोर्टाने सांगितलं. पीडितेची साक्ष विश्वासार्ह असल्यास त्याआधारे निकाल देण्याची कोर्टाने तयारी दाखवली.

संबंधित बातम्या :

प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, तरुणीच्या हातावरील नावामुळे मारेकऱ्याचा शोध

किस न दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीची हत्या