बुलडाणा : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी (Buldhana Bhendwal Bhavishyavani) भेंडवळची भविष्यवाणी यावर्षी स्थगित करण्यात आली आहे. पाऊस-पाण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या बुलडाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीला 300 वर्षांची परंपरा आहे. घटमांडणी करुन पीक-पाण्याचा अंदाज या भेंडवळच्या भविष्यवाणीतून केला जातो. राज्यभरातील शेतकऱ्यांचं या अंदाजाकडे लक्ष असतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदाची घटमांडणीही (Buldhana Bhendwal Bhavishyavani) स्थगित करण्यात आली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी पुढे ढकलून लॉकडाऊन संपल्यावर म्हणजेच 3 मेनंतर वैशाख महिन्यातील कुठल्याही शुभ तिथीला घटमांडणी साकारण्याचे संकेत वाघ महाराजांनी दिले आहेत. त्यामुळे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित झाली आहे.
Pune Corona Update | पुण्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत 195 कोरोना रुग्ण, कोणत्या वॉर्डात किती?https://t.co/SP6MqBWVYO #PuneFightsCovid19 #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2020
बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात गेल्या 300 वर्षांपासून घटमांडणीची परंपरा आहे. येथील वाघ घराण्यात ही परंपरा असून, गेल्या 300 वर्षांपूर्वी निलावती विद्येचे ज्ञान असलेले चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरु केली होती. आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरु आहे (Buldhana Bhendwal Bhavishyavani). जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील शेतकर्यांचा या मांडणीच्या भाकितावर प्रचंड विश्वास आहे. शेतकरी या मांडणीवर दरवर्षी पीक-पाण्याचे नियोजन करतात.
भेंडवळची घटमांडणी कशी केली जाते?
अक्षयतृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन त्यात पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी केली जाते.
दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य वर्तवण्यात येते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसर्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं. आतापर्यंत हे भाकित वयोवृध्द रामदास वाघ हे कथन करायचे. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर वाघ हे भविष्य कथन करतात.
या घटमांडणीला जवळपास 4 ते 5 हजार लोक जमतात. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून प्रशासनाला सहकार्य म्हणून अक्षयतृतीयेची घटमांडणी रद्द करीत असून वैशाख महिन्यातील कुठल्याही तिथीला, लॉकडाऊन संपल्यानंतर घटमांडणी करता येईल, असे सारंगधर महाराजांनी (Buldhana Bhendwal Bhavishyavani) सांगितलं.
संबंधित बातम्या :
Coronavirus Lockdown : दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्राने नेमकं काय म्हटलंय?
Yavatmal Corona Update | यवतमाळला वाढता विळखा, कोरोनाबाधितांची संख्या 25 वर
कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख