मुंंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Business profit during lockdown) आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानं, उद्योग सर्व बंद आहेत. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना तोटा होत आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान जगभरातील असे काही उद्योजक आहेत. त्यांना उद्योगामध्ये मोठा फायदा होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अमेझॉनचे संस्थापक जेफ बझोस, झूप अॅपचे मालक अॅरिक युआन आणि टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांचा समावेश आहे. या तीन उद्योजकांना लॉकडाऊनमध्ये तब्बल अरब डॉलरचा फायदा (Business profit during lockdown) झाला आहे.
जेफ बेझोस
जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मोठी वाढ झाली आहे. अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या इनमकममध्ये 1 जानेवारी ते 10 एप्रिलपर्यंत जवळपास 1 अरब डॉलरची वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करत आहेत.
अॅरिक युआन
झूम अॅपचे मालक अॅरिक युआन यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊन दरम्यान मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात (1 जानेवारी ते 10 एप्रिलपर्यंत) युआन यांच्या इनकममध्ये 1 अरब डॉलरची वाढ झाली आहे. झूम अॅपच्या माध्यमातून एकाचवेळी 100 लोक व्हिडीओ कॉन्फरेन्स करु शकतात आणि लॉकडाऊनमध्ये या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.
अॅलन मस्क
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांना व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. अशावेळी फोर्ड मोटर्स, जनरल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेस्लासारख्या कंपन्या व्हेंटिलेटर तयार करुन रुग्णालयाला देत आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 10 एप्रिलपर्यंत टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांच्या इनकममध्ये 1 अरब डॉलरची वाढ झाली आहे.
दरम्यान, जगभरात आतापर्यंत 27 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाख 90 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत 50 हजार पेक्षा अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.