मेदक (तेलंगाणा) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 6 फुटाचा पुतळा उभारणाऱ्या तेलंगाणातील बस्सा कृष्णा या चाहत्याचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं रविवारी निधन झालं. ट्रम्पना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती कळताच बस्सा कृष्णाला धक्का बसला होता. त्यानंतर त्यानं ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली होती. (Bussa Krishna fan of Donald Trump passes away due to cardiac arrest)
बस्सा कृष्णा (32) चं मेदक जिल्ह्यातील तूपरण इथं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याचं कळताच बस्सा कृष्णा यांना मानसिक धक्का बसला होता. कृष्णा याच्या कुटुंबीयांनी ट्रम्प बरे होतील, त्यामुळं ताण घेण्याची गरज नाही, असे समजावले होते. पण, बस्सा कृष्णा यांच्या भूमिकेत बदल झाला नाही.
Telangana: Bussa Krishna, who had installed a 6-feet statue of US President Donald Trump last year and worshipped him, passes away due to cardiac arrest, in Medak. (In file pics – Bussa Krishna) pic.twitter.com/ucNm4pTHfj
— ANI (@ANI) October 11, 2020
चार वर्षापूर्वी कृष्णा यानं जनगाव जिल्ह्यातील कोन्ने गावी डोनाल्ड ट्रम्प यांचा 6 फुट ऊंचीची पुतळा स्थापन केली होती. कृष्णा ट्रम्प यांच्या पुतळ्याची पूजा करत होता.कृष्णानं मृत्यूच्या एक दिवस अगोदर ट्रम्प कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करणारा भावनिक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं ”ट्रम्प माझ्यासाठी देव आहेत, माझे त्यांच्यावर प्रेम आहे, ते लवकरच बरे होतील,असं व्हिडीओत म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कृष्णा त्याच्या गावी विशेष पूजा आणि अन्नदानाचं आयोजन करत होता. या दिवशी तो फळ, मिठाई आणि चॉकलेटचं वाटप करायचा. बस्सा कृष्णा यांचं डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचं स्वप्न होतं, मात्र ते अपुरं राहिलं.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या दोघांना कोरोना संसर्ग झाला होता. ट्रम्प यांनी नुकतंच कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं होतं.
संबंधित बातम्या :
खरंच ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह की पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन
(Bussa Krishna fan of Donald Trump passes away due to cardiac arrest)