नागपूर : नागपुरात काल दिवसभरात नऊ जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर पाच जणांनी कोरोनावर मातही केली. विशेष म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ‘कर्करोग’ग्रस्ताचाही समावेश आहे. नागपुरात आतापर्यंत 56 जणांनी कोरोनाला धोबीपछाड दिली. (Cancer Patient Corona Free)
नागपुरात काल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकला, पाच आणि सात वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. नागपुरातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या आता 160 वर पोहोचली आहे.
नागपुरात कालच्या दिवसात पॉझिटिव्ह सापडलेल्या काही रुग्णांना आमदार निवासात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलं होतं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. हे रुग्ण आढळलेल्या मोमीनपुरा आणि डोबीनगर भागातील 350 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांची आरोग्य तपासणी सुरु आहे.
नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पाच जणांनी काल कोरोनावर मात केली. यात एका कॅन्सर रुग्णाचाही समावेश आहे. काल कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 56 झाली आहे.
रविवार 3 मे रोजी नागपुरात एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नव्हता. जिल्ह्यातील 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला होता.
राज्य सरकारने परिपत्रक काढून लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याचं जाहीर केलं. मात्र, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कुठलीही सवलत मिळणार नाही. ज्याप्रकारे 3 मेपर्यंत निर्बंध होते, तसेच निर्बंध 17 मेपर्यंत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Lockdown 3.0 | नोकरभरती रद्द, चालू कामंही बंद, ठाकरे सरकारचे मोठे निर्णयhttps://t.co/TVjeOqXA01#ThackerayGovernment #Lockdown #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2020