सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला (Car accident by falling in well in Sangli). या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. गाडीतील सर्व लोक नातेवाईकाच्या धन विधीसाठी जात होते. त्याचवेळी गाडी पारेकरवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली (Car accident by falling in well in Sangli).
संबंधित लोक साताऱ्यामधील चितळीच्या आपल्या नातेवाईकाच्या धन विधीसाठी कारने प्रवास करत होते. दरम्यान, पारेकरवाडी येथे आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कारमध्ये पडली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. गाडीतील एकजण अपघातानंतर गाडीची काच फोडून बाहेर आला. त्यामुळे तो या अपघातातून बचावला.
मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40) आणि शोभा पाटील (38) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.