कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Jul 29, 2020 | 11:40 PM

मिरजेत कोरोना रुग्णावर उपचारास टाळाटाळ करणाऱ्या 8 नर्सिंग स्टाफ विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला (Case filed against 8 Nursing Staff In Sangli) आहे.

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Follow us on

सांगली : मिरजेत कोरोना रुग्णावर उपचारास टाळाटाळ करणाऱ्या 8 नर्सिंग स्टाफ विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवा सदन रुग्णालयातील 8 जणांवर मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. (Case filed against 8 Nursing Staff In Sangli)

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील सेवा सदन हे खासगी हॉस्पिटल असून ते कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आले आहे. मात्र सेवासदन हॉस्पिटलमधील पूजा कलाब, योगेश आवळे, केतन कांबळे, केतन सूर्यवंशी, ज्योती कांबळे, श्वेता भाट, ऋषिकेश पाटील आणि पूजा भोसले या आठ जणांनी कोव्हिड रुग्णावर उपचार टाळाटाळ केली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्यातंर्गत या आठ नर्सेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मेस्मातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज सांगलीत नव्या 167 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2065 वर पोहोचली आहे. सध्या सांगलीत 1043 रुग्ण उपचार घेत आहे. तर 952 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Case filed against 8 Nursing Staff In Sangli)

संबंधित बातम्या :

सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा

अहमदनगरमधील शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील दोघांना बाधा