मंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयचा तपास वेगाने (CBI Recreate The Crime Scene At Sushant Singh Rajputs House) सुरु आहे. सिद्धार्थ पिठाणी, नीरज सिंह याची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सकाळी जवळपास 3 तासापेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुशांत सिंहच्या वांद्रे स्थित घरी सीबीआय टीम घेऊन गेली. तिथे पिठाणी, नीरज आणि दीपेश सावंत यांना नेण्यात आला होतं. तिथे क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. हे सर्व करायला सीबीआयच्या पथकाला जवळपास साडे पाच तास लागले (CBI Recreate The Crime Scene At Sushant Singh Rajputs House).
सीबीआयच्या पथकाने या तिघांकडून 14 जून रोजी नेमका काय घटनाक्रम झाला होता, याबाबत माहिती घेतली. तसेच, या तिघांनी जी जबाबदारी सुशांतच्या आत्महत्येनंतर पार पाडली होती, ती सर्व त्यांच्याकडून रिक्रिएट करण्यात आली. एकूण साडे आठ तास हे तिघे सीबीआयच्या पथकासोबत होते.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ पिठाणी आणि नीरजची जी काही चौकशी केली आहे आणि या दोघांनी जे स्टेटमेंट्स दिले आहेत. त्यात तफावत असल्याची माहिती आहे. म्हणूनच या दोघांना आज पुन्हा बोलावण्यात आले होते. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दोघांकडून सीबीआय अधिकाऱ्यांनी यांची चौकशी केली.
सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज या दोघांच्या जबाबात विरोधाभास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज या दोघांच्या जबाबात विरोधाभास असल्याने त्यांची पुन्हा चौकशी केली गेली. या दोघांना वारंवार 13 आणि 14 जून रोजी जो काही घटनाक्रम झाला होता त्या संदर्भात विचारलं जात होतं (CBI Recreate The Crime Scene At Sushant Singh Rajputs House).
मागील दोन दिवसांपासून सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांनी दिलेल्या जबाबात त्या दोघांनी एकमेकांच्या जबाबाच्या विरोधाभासी जबाब दिलेला आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ पिठाणीला विशिष्ट प्रश्न विचारले आहे. त्यात पिठाणी हा सुशांत आणि रियाच्या संपर्कात कसा आला आणि 8 जून रोजी नेमकं काय झालं?, जेव्हा रिया सुशांतचं घर सोडून गेली होती, या प्रश्नांचा समोवेश होता.
विशेष म्हणजे आज सकाळपासून सिद्धार्थ पिठाणी, नीरज आणि दीपेश सावंत हे तिघेही सीबीआयसोबत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये होते.
Sushant case | सुशांतच्या घरी 13 जूनला कोणताही पार्टी नव्हती, शेजाऱ्यांच्या माहितीने ट्विस्टhttps://t.co/ACXx4ixvNK#SushantSinghRajput #SushantSinghSuicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2020
CBI Recreate The Crime Scene At Sushant Singh Rajputs House
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी