नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत (School Re-Open Letter Central To state government) वाढवण्यात आला आहे. नुकतंच केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी करत लॉकडाऊन पाचची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्र लिहित वेगवेगळे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकार आपपल्या राज्यात शाळा कधीपर्यंत सुरु करु शकता, याबाबतची विचारणाही या पत्रातून करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्य व केंद्र शासित प्रदेशांना पत्र (School Re-Open Letter Central To state government) पाठवले आहे. त्यानुसार, कोणत्या राज्यात कधी शाळा सुरु करता येऊ शकतात, याबाबतची विचारणा केली आहे. तसेच शाळा सुरु करताना त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना करता येतील. तसेच शाळा कशा सुरु करता येऊ शकतात याची माहिती केंद्र सरकारला सांगणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय शाळा कॉलेज सुरु ठेवण्याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन त्यांचे मत द्यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
केंद्राने राज्यांना जे निर्देश दिले आहे. ते पाळून गाईडलाईन्स बनवा असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कडक ठेवण्याचे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत.राज्यांतर्गत वाहतुकीबद्दल यात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील कंटेंन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी अटी शर्तींसह काही शिथीलता देण्यात आली आहे. त्याबाबतच्या गाईडलाईन्सचे राज्याने पालन करावे.
हा लॉकडाऊन घोषित करताना केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत.
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.
पहिला टप्पा – 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.
दुसरा टप्पा – यामध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल.
तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. (School Re-Open Letter Central To state government)
संबंधित बातम्या
Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?
LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी