दादर दरबार : जुन्या रेल्वे कोचपासून तयार झाले चाकावरील हायफाय रेस्टॉरंट सुरु, पाहा कुठे

| Updated on: Jul 02, 2024 | 1:33 PM

मध्य रेल्वेने आता जुन्या रेल्वे डब्याला रेस्टॉरंटचे स्वरुप देत त्याचे आलीशान रेस्टॉरंटमध्ये रुपांतर केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसह सामान्य नागरिकांनाही रेल्वे थीमवरील या रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा करता येणार आहे.

दादर दरबार : जुन्या रेल्वे कोचपासून तयार झाले चाकावरील हायफाय रेस्टॉरंट सुरु, पाहा कुठे
dadar darbar, central railway
Follow us on

रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात एक रेल कोच रेस्टॉरंट कोरोना काळात उभारण्यात आले होते. आता दादर रेल्वे स्थानकात देखील रेल्वेने जुन्या कोचला मॉडीफाय करीत रेल्वे थीमचे दादर दरबार नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. रेल्वे प्रवासी आणि इतर नागरिक देखील या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आनंद लुटू शकतात. तर पाहूयात या रेल कोच रेस्टॉरंटची काय आहेत वैशिष्ट्ये…

मध्य रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील्स नावाने रेल्वेच्या जुन्या डब्यांना रेस्टॉरंटचे स्वरुप दिले आहे. दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी मध्य रेल्वेने हे रेस्टॉरंट सुरु केल्याने प्रवाशांसह रेल्वेचाही फायदा होणार आहे. जुन्या कोडल लाईफ संपलेल्या रेल्वे डब्यांना रेस्टॉरंटमध्ये बदललण्याची संकल्पना मध्य रेल्वेने सुरु केली आहे. रेल्वे प्रेमींना अशा कोचमधील रेस्टॉरंटमध्ये न्याहरी किंवा लंच डीनर करायला नक्की आवडेल असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जेवणाचे उत्तम ठिकाण

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने हा उपक्रम सुरु केला आहे. ‘दादर दरबार’ या हॉटेलसाठी ‘मेसर्स युनिक एंटरप्रायझेस’ ला 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. परवाना शुल्कासह वार्षिक रु.५८.११ ई-लिलावाद्वारे हे टेंडर वाटप करण्यात आले आहे. मध्य रेल्वेला दरवर्षी रु. १५.५९ लाख मिळणार आहेत. जुन्या रेल्वे डब्याला मुंबईतील एका प्रसिद्ध वास्तुविशारदाकडून डिझाइन केले असून त्याला रेस्टॉरंटचा लूक दिला आहे. अशाच धर्तीचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, अमरावती आणि अकोला येथे देखील कार्यरत आहेत.