Chanakya Niti : जर तुमच्यात हे गुण असतील तर प्रत्येक कामात येईल यश, मुठीत असेल जग सारे

| Updated on: Nov 19, 2024 | 8:34 PM

आचार्य चाणक्य यांचा 'चाणक्य नीती' हा ग्रंथ केवळ सैद्धांतिक ग्रंथ नसून दैनंदिन व्यावहारिक ज्ञानाचा एक मोठा खजाना आहे. त्यांच्या पुस्तकात त्यांनी अशा एका गुणाची चर्चा केली आहे, ज्याचा विकास करून माणूस प्रत्येक कामात विजय मिळवू शकतो आणि जग आपल्या मुठीत घेऊ शकतो. चला तर पाहूयात, हा गुण काय आहे?

Chanakya Niti : जर तुमच्यात हे गुण असतील तर प्रत्येक कामात येईल यश, मुठीत असेल जग सारे
Follow us on

भारतीय इतिहासात आचार्य चाणक्य हे महान अर्थ शास्रज्ञ होऊन गेले. त्यांनी राजनीती, अर्थशास्र, नितीशास्र आणि कूटनीतीचे जाणकार होते. चाणक्य यांच्या नीतीशास्रावर चालून चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंशाची स्थापना करुन भारतात पहिले साम्राज्य स्थापन केले होते. ज्याला मगध साम्राज्य म्हटले जाते. जर आचार्य चाणक्य यांची साथ नसती तर हे साम्राज्य स्थापन झाले नसते. त्यांच्या दूरदृष्टीने मौर्य साम्राज्याला एक मजबूत आणि समृद्ध साम्राज्यात परिवर्तित केले.

आचार्य चाणक्यांच्या मते शत्रूला मित्र बनविणे आणि किंवा मित्राला शत्रू बनविणे राजनितीच्या महत्वाचा हीस्सा आहे. चाणक्य यांचे नितीशास्र आजही लागू होते. राजकारणी, व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांना यातून प्रेरणा मिळते. चाणक्यांच्या गोष्टी केवळ पुस्तकी नाही. ते रोजच्या जीवनाशी संबंधित त्या असतात. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य निती पुस्तकात एका गुणाने युक्त अशा व्यक्तीची गोष्ट सांगितली आहे.जो नेहमी बिनधास्त, निष्कलंक आणि अपराजित रहातो. त्यांनी असे गुण विकसित करण्याचा सल्ला दिला आहे ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळते.

असा व्यक्ती जग जिंकतो –

आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत सांगितले आहेत. आपल्या मनाला आणि विचारांना आपला दास बनविणारा व्यक्ती नेहमी इतर लोकांपेक्षा दोन पाऊले पुढे असतो. असा गुण आहे जो असाच व्यक्ती विकसित करु शकतो जो केवळ बुद्धीमानच नाहीत तर आचरणात सदाचारी आणि खूपच व्यवहारीक असतात. मन आणि विचार जिंकणारे लोक जग जिंकण्याची ताकद बाळगतात.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक कामात यश –

चाणक्य यांनी म्हटले की आपले मन एक शक्तीशाली उपकरण आहे. हे आपल्या विचार,भावनांवर आणि कार्यावर नियंत्रण ठेवते. जर आपण आपल्या मनाला नियंत्रित केले तर आपण आपल्या जीवनाला कोणत्याही दिशेला वळवू शकतो. जे लोक स्वत:वर नियंत्रण ठेवण्यात शिकतात ते जीवनात नवनवीन शिखरे पादाक्रांत करतात.त्यांचे यश आधीच्या यशा पेक्षा मोठे असते. हे लोक धन-दौलतीच्या राशी मिळवू शकतात. आणि त्यांना पैशाची आसक्ती नसल्याने ते नेहमी आनंदी राहतात.

जग असणार मुठ्ठीत –

लोकांना जर स्वत:ला नियंत्रित करता आले तर ते जगाला देखील आपल्या तालावर नाचवू शकतील. ही वचन एक सत्य आहे.याचा उल्लेख केवळ चाणक्य नितीतच नाही तर वेद, उपनिषद, आरण्यक, स्मृती ग्रंथासहित सर्व भारतीय निती ग्रंथात केलेला आहे. जेव्हा कोणी व्यक्ती स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढत असतो. आणि आत्मविश्वास हीच तर यशाची चावी आहे.