आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतीमध्ये (Chanakya Niti) मनुष्याच्या जीवनाविषयी अनेक माहिती दिली आहे. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक मनुष्याचे शत्रू असतात. चाणक्य नीतीनुसार कुठल्याही व्यक्तीने आपल्या शत्रूला कमकुवत समजू नये (defeat the enemy by chanakya niti). शत्रूपासून कायम सावध राहायला हवे.अन्यथा संधी मिळताच तुमचा शत्रू तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये शत्रूंचा पराभव करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने शत्रूवर मात करता येणे सहज शक्य आहे. चाणक्य नीतीनुसार, कुठलीही व्यक्ती आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपल्या मित्रांसोबत आणि कामाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवते. अशावेळी आपले मित्र आणि कामाच्या ठिकाणी सहकर्मचारी यांच्याकडे आपल्या अडचणी आणि खाजगी आयुष्यातले चढ-उतार कधीच सांगू नका. कारण तुमचे मित्र हे तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या शत्रूचेही मित्र असू शकतात. तुमच्या खाजगी गोष्टी किंवा अडचणी तुमच्या शत्रूला माहिती झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
चाणक्य नीतीनुसार माणसाने आपल्या वाणीची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचा शत्रू त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या बोलण्यात कडवेपणा असेल तर तुमचे नाते बिघडू शकते. कडू बोलण्यामुळे तुमचे चांगले मित्र आणि नातेवाईक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. जे लोक कडवट आणि कठोर बोलतात इतर लोकं त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करतात. म्हणूनच कोणाशीही बोलताना नेहमी तुमचा वाणीत गोडवा ठेवा आणि लोकांशी नम्रतेने वागा. ज्यामुळे तुमचे शत्रू तयार होणार नाही.
व्यसनासारख्या वाईट सवयींपासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांकडून शत्रूंचा सहज पराभव होतो. नशेत असलेली व्यक्ती आपली बुद्धी आणि विवेक वापरण्यास असमर्थ असते आणि अशा परिस्थितीत तो अनेक चुका करतो, ज्याचा फायदा तुमचे शत्रू घेऊ शकतात.
याशिवाय जर तुम्हाला तुमच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर तुमच्या शत्रूशी संबंधित प्रत्येक माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शत्रूचे सामर्थ्य माहित असले पाहिजे. जर तुमच्याकडे तुमच्या शत्रूची संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही त्याचा सहज पराभव करू शकाल.
तुमच्या शत्रूवर कायम तुमचा प्रभाव ठेवा. आचार्य चाणक्य यांच्या मते एखादा साप विषारी जरी नसला तरी त्याला फुस्कारने यायला हवे ज्यामुळे तो स्वतःवर येणारे संकट टाळू शकतो. स्वतःचे व्यक्तिमत्व नेहमी प्रभावी ठेवा. इतरांची मदत करा. स्वतःमध्ये लीडरशिप स्किल वाढवा. या सर्वांचा फायदा तुम्हाला तुमच्या शत्रूवर मात करण्यासाठी नक्कीच होईल.