चंद्रपुरात वाघाची दहशत! कामगारांचा जीव गेल्यानंतर अखेर तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश

| Updated on: Feb 20, 2022 | 5:01 PM

ताडोबा जंगलातील वाघ हे परिसरातील नागरिकांचा बळी घेत आहेत. त्यामुळं परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. एका कामगाराचा जीव (Victims of Workers) गेल्यानंतर अखेर वनविभागाला जाग आली. त्यांनी अखेर तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश दिलेत. परंतु, इतर वाघांनी हल्ला केल्यास काय, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

चंद्रपुरात वाघाची दहशत! कामगारांचा जीव गेल्यानंतर अखेर तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश
चंद्रपूर येथील महाऔष्णीक वीज केंद्र.
Follow us on

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात भोजराज मेश्राम या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर महाऔष्णिक वीज केंद्रातील तीन वाघ जेरबंद करण्याचे आदेश चंद्रपूर वनविभागाला (Chandrapur Forest Department) मिळाले आहेत. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (Chief Conservator of Forests) (वन्यजीव) यांनी हे आदेश निर्गमित केलेत. सीटीपीएस वन ही वाघीण आणि तिच्या अंदाजे दोन वर्षे वयाच्या दोन पिल्लांना जेरबंद करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्र (Chandrapur Coal Power Station) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर आहे. वाघ केंद्राच्या आवारात भटकताना काही जणांना दिसला. या वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत होती. परंतु, तत्पूर्वी वाघाने डाव साधला. त्यामुळं या वाघांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले.

कामगाराचे शीर केले होते धडावेगळे

अशातच सोळा फेब्रुवारीला रात्री पावणेअकरा वाजता वाघाने कामगाराला उचलून नेले. काम पूर्ण करून सायकलने ते घरी येत होते. भोजराज मेश्राम असं या कामगाराचे नाव आहे. भोजराज यांना वाघाने उचलून नेल्यानंतर त्यांचे शीर धडावेगळे केले होते. सायकल तिथंच पडून होती. याची वीज केंद्राच्या व्यवस्थापनाला आणि वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने शोधमोहीम राबविल्यानंतर भोजराज यांचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला.

मृतकांच्या कुटुंबीयांना मदत

भोजराज मेश्राम यांच्या कुटुंबीयांना वनविभाग, वीज केंद्र व्यवस्थापन व कुणाल एंटरप्रायजेसच्या संचालकाने आर्थिक मदत केली. वनविभागाने तातडीने वीस हजार रुपये त्यांच्या कुटुंबियांना दिले. शासनातर्फे दहा लाखांचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांनी दिली. ईएसआयसीच्या माध्यमातून मृतकाच्या पत्नीला बारा हजार रुपयांचे भविष्य निर्वाह निधी आणि कुटुंबातील व्यक्तीला संबंधित कंत्राटदाराकडे नोकरी दिली जाणार आहे.

Video – संजय राऊतांचा नारायण राणेंवर आरोप, मुख्यमंत्री केव्हा मौन सोडणार?, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?