लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच आता काही नेत्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. त्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. आज मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आशीर्वाद यात्रा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच स्थानिकांशी संवाद साधताना त्यांना आश्वस्त केलं. निवडून आल्यानंतर जनतेची कामं करण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असं ते म्हणाले.
लक्षात ठेवा खबरदार करतोय. तुम्ही लोकांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मतदान कराल. तर 4 वर्ष 8 महिने 29 दिवस तुमच्या डोळ्यात अश्रू असतील. तुलना प्रगतीची करा हेच घेऊज जनतेपर्यंत न्यायचं आहे. दिला शब्द केला पूर्ण हेच आजपर्यंत करत आलो आहे. मी जर निवडून आलो तर नवीन कल्पनाच्या माध्यमातून विकास करेल, असा शब्द मुनगंटीवार यांनी दिला.
महायुतीचा कार्यकर्ता हा कृत्रिम काम करत नाही. तो अबकी बार 400 पार चा नारा देत आहे. ही निवडणूक माझी नाही, तर ही तुमची निवडणूक आहे. विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजयचं नाही. ही लढाई काँग्रेसच्या उमेदवारसोबत नाही. मी आजवर भाषण दिली. ती विकासावर दिली. 2 वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं. 55 वर्ष तुमचे सरकार होते. हे खोटं प्रचार करणार आहेत. त्यामुळे सावधान राहा, असं मुनगंटीवार म्हणाले.
एक पुण्य आहे की भारत मातेच्या गर्भात आमचा जन्म झाला. अटलजी, अडवाणीजी, मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये दोन विषय आहे की जातीचा विषय आहे. जातीच्या माध्यमातून प्रचार करत असेल तर पायावर दगड मारून घेत आहे. बाकीच्या समाजाने काय करावे? या मतदारसंघात कुणबी, ओबीसी, तेली, बंगाली सर्वांची सेवा करेल. अनुसूचित जातींच्या बांधवांसाठी मोठं काम करेल. आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
कोणाचे नाव घेतले नसेल तर पाय आपटू नका. नाहीतर आपल्याला निवडणूकमध्ये आपटावे लागेल… आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून धन्यवाद… मी महाकालीचा आशीर्वाद घेऊन आलोच आहे. पण ज्याच्या नावात देव आहे. ते स्वतः जर आले असतील तर कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. माँ जगदंबेचे भक्त बावनकुळेजी या ठिकाणी आले आहेत. सगळ्यांचे आभार, असं मुनगंटीवार म्हणाले.