मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘चंद्रयान-2’च्या (Mission Chandrayaan 2) लँडर विक्रमचा मध्यरात्री (7 सप्टेंबर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या काही क्षणांपूर्वी इस्त्रोशी संपर्क तुटला (Vikram lander connection lost). त्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग ‘भाई लँड करा दे’ ट्रेंड होतो आहे (Hashtag Bhai land kara de). याच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोक ‘चंद्रयान-2’ आणि इस्त्रोसंबंधी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुण पॅराग्लायडिंग इंस्ट्रक्टरला त्याला जमीनीवर उतरवण्यासाठी विनवण्या करत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पडताच तो वाऱ्यासारख व्हायरल झाला. त्यावर अनेक मीम्स बनले. या व्हिडीओतील तरुण त्याच्या या विनोदी व्हिडीओमुळे एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनला.
‘500 जास्त घेऊन घे, पण लँड कर’
हा तरुण त्याच्या इंस्ट्रक्टरला व्हिडीओमध्ये म्हणत होता की, “भाऊ बस लँड कर, भाऊ 500 जास्त घेऊन घे पण लँड कर”. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता.
सध्या याच व्हिडीओचे वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत.
एका युझरने लिहिलं, “हॅशटॅग ‘भाई लँड करा दे’, त्या क्षणाला प्रत्येक भारतीयाच्या याच भावना होत्या, इस्त्रो आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे.”
Feeling of Every Indian in those moments.
But, nevertheless We are proud of you ISRO ?❤️#ISRO #Chandrayaan2 #VikramLander #bhailandkarade pic.twitter.com/ryXRDtmGeY— Sumit Kakkar (@SumitKakkar7) September 6, 2019
#bhailandkarade #VikramLander #Chandrayaan2Live #Chandrayaan2Landing pic.twitter.com/N3kZqJCaUU
— Shruti Sharma (@sharma_shruti) September 6, 2019
तर एकाने लिहिलं, “चंद्रयान-2 ची काहीही माहिती मिळत नाहीये, पण इथपर्यंत पोहोचणे हे देखील एक मोठं यश आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. हॅशटॅग इस्त्रो मिशन, हॅशटॅग भाई लँड करा दे.”
‘100, 200 जास्त घेऊन घे पण लँड कर’
“चंद्रयान-2 लँडिंग 100, 200 जास्त घे… हॅशटग भाई लँड करा दे.”, असं ट्वीट केलं.
#Chandrayaan2Landing 100 200 zyada lele… #bhailandkarade !!!
— Mukund Mundra (@MukundMundra1) September 6, 2019
भाई 100- 200 रुपये ज्यादा ले लेना पर सही से लैंड करवा देना #Chandrayaan2 #bhailandkarade @Atheist_Krishna @realshooterdadi @Patellikhmaram pic.twitter.com/LcRfa6x9g1
— D Raj ?️atel (@MJPATEL0) September 6, 2019
2.1 किमी अंतरावर लँडर विक्रमशी संपर्क तुटला
लँडर विक्रमशी संपर्क टुटल्याची घोषणा इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी केली. चंद्राच्या जमीनीपासून 2.1 किलोमीटरच्या उंचीवर लँडरचं प्रदर्शन योजनेनुसारच होतं, मात्र त्यानंतर त्याचा संपर्क तुटला, अशी माहिती के. सिवन यांनी दिली.
This is Mission Control Centre. #VikramLander descent was as planned and normal performance was observed up to an altitude of 2.1 km. Subsequently, communication from Lander to the ground stations was lost. Data is being analyzed.#ISRO
— ISRO (@isro) September 6, 2019
तर, ‘चंद्रयान 2’चा 2,379 किलोग्रॅम वजनाचा ऑर्बिटर अद्याप चंद्राभवती फिरत आहे. हे ऑर्बिटर आपल्याला पुढील एक वर्षापर्यंत चंद्राचे फोटो पाठवू शकणार आहे. चंद्रयान 2 मोहिम 95 टक्के कार्यक्षम असून चंद्राच्या बाजूने फिरत आहे, अशी माहिती इस्त्रोच्या एका शास्त्रज्ञाने दिली.
संबंधित बातम्या :
चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास
Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर
चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान
‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा
Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?
Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं