Mission Chandrayaan-2 श्रीहरीकोटा : 7 सप्टेंबर 2019 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवला जाणार आहे. भारताच्या ‘चंद्रयान-2’ (Chandrayan 2) चा लँडर ‘विक्रम’ (Lander Vikram) आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ (Rover Pragyaan) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing on Lunar Surface) करणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ (Indian Space Research Organisation, ISRO) सह तमाम देशवासी या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘चंद्रयान 2’ आज मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरताच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, यूएस आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र आजवर कधीही समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं मिशन आखणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे इथे लँडिंग करुन विक्रम हा ‘विक्रम’ आपल्या नावे करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशभरातून निवडलेल्या 60 ते 70 विद्यार्थ्यांसोबत ‘इस्रो’मधून हा क्षण अनुभवणार आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.
‘इस्रो’चं महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ 22 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं. चंद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे. भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.
20 ऑगस्टला ‘चंद्रयान-2’ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. लँडर ‘विक्रम’ 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून विलग झाला. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत राहणार असून लँडर ‘विक्रम’ हा पृष्ठभागावर उतरेल. तर रोव्हर ‘प्रज्ञान’ मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर फिरत संशोधन करेल.
‘चंद्रयान-2’ सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास करुन चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवसांचा कालावधी लागला. 978 कोटी रुपये खर्च करुन केलेलं हे मानवविरहित मिशन आहे.
चंद्रयान 2 सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून 35 किमी अंतरावर आहे. या ठिकाणाहून जेव्हा ‘चंद्रयान 2’ चंद्राच्या दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात करेल, ती 15 मिनिटं अत्यंत थरारक असतील. कारण ‘इस्रो’साठी हा पहिलाच अनुभव आहे.
चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये
‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा
Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?