विक्रम लँडरला शोधण्यासाठी आता ‘नासा’ही मदतीला

| Updated on: Sep 12, 2019 | 5:02 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चंद्रावर असलेल्या विक्रमशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्यासाठी 'हेलो' मेसेज पाठवला आहे (NASA sent a message to Vikram Lander).

विक्रम लँडरला शोधण्यासाठी आता नासाही मदतीला
Follow us on

मुंबई : चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर असताना मार्ग भरकटलेल्या ‘चंद्रयान-2’ मोहिमेतील ‘विक्रम लँडर’शी अद्यापही संपर्क झालेला नाही (Vikram Lander Lost). भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चंद्रावर असलेल्या विक्रमशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्यासाठी ‘हेलो’ मेसेज पाठवला आहे (NASA sent a message to Vikram Lander).

नासाने विक्रम लँडरला रेडियो संदेश पाठवला

नासाने डीप स्पेस नेटवर्क (DSN)च्या जेट प्रपल्शन लेबोरेटरी (JPL)मधून विक्रम लँडरला रेडियो संदेश पाठवला. नासाच्या सूत्रांनुसार, इस्रोच्या सहमतीनंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी रेडिओ संदेश पाठवला आहे.

6 दिवस उलटूनही विक्रमशी संपर्क नाही

जसे-जसे दिवस जात आहेत, तसे विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशाही मावळत चालली आहे. इस्रोच्या अंदाजानुसार, विक्रमला फक्त एका ल्युनर डेसाठीच सरळ सुर्यप्रकाश मिळेल. म्हणजेच 14 दिवसांपर्यंत विक्रमला सूर्यप्रकाश मिळेल. त्यामुळे इस्रो 14 दिवसांपर्यंत आपले प्रयत्न सुरु ठेवू शकतो. जर इस्रोला विक्रमच्या कम्युनिकेशन इक्विपमेंटला नुकसान झाल्याची माहिती मिळाली तर तो 14 दिवसांच्या अगोदरही प्रयत्न थांबवू शकतो.

14 दिवसांनंतर एक मोठी रात्र असेल. जर लँडरने सॉफ्ट लँडिंग केली असतीस, तरी या रात्रीत वाचणे त्याला शक्य झालं नसतं. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग करुन आता 6 दिवस झाले आहेत. अशा वेळी 20-21 सप्टेंबरपर्यंत जर विक्रमशी संपर्क झाला नाही तर त्याच्याशी संपर्क होण्याची आशाही उरणार नाही.

कॅलिफोर्नियाच्या स्टेशनवरुन संदेश पाठवला

नासाने कॅलिफोर्निया येथील DSN च्या माध्यमातून विक्रमला रेडियो संदेश पाठवला आहे, असं एका अंतराळ वैज्ञानिकाने सांगितलं. DSN ने 12 किलोवॅटची रेडियो फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून विक्रमशी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला आहे. लँडरला सिग्नल पाठवल्यानंतर चंद्र एक रेडियो रिफ्लेक्टरसारखं काम करतो आणि सिग्नलचा छोटासा भाग पृथ्वीवर पाठवतो. असेही त्यांनी सांगितलं.

नासाला यापासून काय फायदा होणार?

नासा भारताच्या या महत्त्वाकांक्षी अशा चंद्र मोहिमेत जातीने लक्ष घालतो आहे. यामागे नासाचा स्वार्थ आहे. पहिलं कारण म्हणजे, विक्रमवर पॅसिव्ह पेलोड लेजर रिफ्लेक्टर लागलेले आहेत, यामुळे लँडरची अचूक जागा आणि पृथ्वी ते चंद्राचं अचूक अंतर कळू शकतं. पृथ्वी ते चंद्राचं अंतर माहित झाल्यावर ते नासाला भविष्यातील त्यांच्या योजनेसाठी महत्त्वाचं ठरु शकतं. पण, लँडर विक्रमच्या चंद्रावरील हार्ड लँडिंगमुळे नासाच्या या आशेवर पाणी फिरलं आहे.

चंद्रयानचा डेटाही नासासाठी महत्त्वाचं

चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरच्या मदतीने जो डेटा मिळेल, ती अत्यंत महत्त्वाचा असेल, अशी आशा नासाला आहे. ऑर्बिटरमध्ये 8 अॅडव्हान्स पेलोड्स आहेत. नासा चंद्राच्या 3D मॅपिंग डेटाची वाट पाहतो आहे. तसेच त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या फोटोची वाट पाहत आहे. कारण, नासा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 2024 पर्यंत मानव मोहीम राबवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवाचे फोटो मिळाल्यानंतर नासाला त्यांच्या मोहिमेत मदत होऊ शकेल.

संबंधित बातम्या :

Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर

‘विक्रम, लवकर उत्तर दे… पावती फाडणार नाही’

#Chandrayaan2 : भारतासाठी मोठा दिलासा! विक्रम लँडरचा शोध लागला, संपर्कासाठी प्रयत्न

Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात

Mission Chandrayaan-2 : सोशल मीडियावर ‘भाई लँड करा दे’ हॅशटॅगचा पाऊस