चेन्नई : देशात कोरोना विषाणूचा (Chennai Journalists Found COVID-19 Positive) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. विशेषकरुन जे लोक कोरोनाशी लढत आहेत त्या लोकांनाही आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. कालच मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता चेन्नईतील एका न्यूज चॅनेलच्या 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Chennai Journalists Found COVID-19 Positive) लागण झाली आहे.
तमिळ न्यूज चॅनेलमध्ये कार्यरत असलेले 25 जण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पत्रकार, कॅमेरामन आणि इतर लोकांचा समावेश आहे, अशी माहिती तामिळनाडू सरकारने दिली आहे.
या न्यूज चॅनलच्या 94 कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे चॅनलला लाईव्ह प्रसारण देखील थांबवावं लागलं होतं. 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Chennai Journalists Found COVID-19 Positive).
मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण, वैद्यकीय सूत्रांची माहितीhttps://t.co/13LAEh2ADe
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2020
मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोना
मुंबईतील एकूण 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये पत्रकार आणि फोटोग्राफर यांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागात वास्तव्यास आहेत.
Chennai Journalists Found COVID-19 Positive
संबंधित बातम्या :
Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित
मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्जवरील जीएसटी कर रद्द करा, राहुल गांधीची मागणी
Corona : भोपाळमध्ये 9 दिवसांच्या बाळाला कोरोना, प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांकडून संसर्ग