नाशिक: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिककरांना इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा भुजबळ यांनी या बैठकीत दिला आहे.(Chhagan Bhujbal warns Nashik residents on increasing incidence of corona)
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या 1200 ने वाढली आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 200 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवाळीनंतर वाढत गेलेल्या रुग्णसंख्येमुळं नाशिक जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याचं नवं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून कोविड पश्चात रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यावी लागणार याबाबत समुपदेशन केलं जाणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
लोककलावंतांना देखील कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव (Lokshahir Madhukar Jadhav) यांच्यावर अक्षरशः भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनने बहुत्वांशी सर्वच क्षेत्रातील अनेकांचे रोजगार हिरावले गेले. लोककलावंतांवरही कोरोनाने पोटापाण्यासाठी वेगळा पर्याय निवडण्याची वेळ आणली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव यांनाही चरितार्थासाठी वेगळा पर्याय निवडावा लागला.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे लोककलावंतांचे हाल, नाशिकमधील शाहीरावर भाजीपाला विक्रीची वेळ!
71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार
Chhagan Bhujbal warns Nashik residents on increasing incidence of corona