बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावात कन्नडीगांचं संतापजनक कृत्य (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Removed) समोर आलं आहे. बेळगावातील एका गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. काल (7 ऑगस्ट) रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
पैसे कमावणे हा शिवसेनेचा धंदा आहे : नारायण राणेhttps://t.co/hE1NoBWSa2 @MeNarayanRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2020
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Removed
संबंधित बातम्या :
उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर, शिवाजी महाराजांवर राजकारण नको : जयंत पाटील