बीजिंग : भारत-चीनमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असतानाच चीनची राजधानी बीजिंगमध्ये मुख्यालय असलेल्या “एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके”कडून (आशियाई पायाभूत सुविधा बँक किंवा एआयआयबी) भारताला 750 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या कर्जासाठी मान्यता देण्यात आली आहे. ‘कोरोना’ व्हायरस साथीच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांना तोंड देण्यास भारताला मदत होईल, असे आशियाई बँकेने बुधवारी सांगितले. (China-backed AIIB approves $750 million loan for India’s COVID-19 response)
चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने बीजिंगचे पाठबळ असलेल्या ‘आशियाई पायाभूत सुविधा बँके’कडून आणखी 750 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 5 हजार 714 कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. आशियाई बँकेचे भारतावर आता 1.25 अब्ज डॉलर्सचे कर्ज झाले आहे.
हेही वाचा : भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड
‘आशियाई विकास बॅंके’चे अर्थसहाय्य लाभलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट व्यवसायांना आर्थिक सहाय्य देऊन बळकट करणे, सामाजिक सुरक्षा जाळे विस्तृत करणे आणि आरोग्यसेवा वाढवणे हे आहे.
हेही वाचा : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं
मे महिन्यात, आशियाई बँकेने भारताला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी 500 दशलक्ष कर्जास मान्यता दिली होती. ही दोन्ही कर्ज ही 10 अब्ज डॉलर्सच्या निधी सुविधेचा भाग आहेत. आशियाई बँकेने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना कोरोनाविरुद्ध लढण्यास मदत करण्याची घोषणा केली आहे.
China-backed AIIB approves $750 million loan for India’s COVID-19 response https://t.co/RvRohjFDYu pic.twitter.com/L5iz14wby7
— Reuters India (@ReutersIndia) June 17, 2020