चीन : तब्बल 71 वर्षानंतर चीनमधल्या बुद्धांच्या मूर्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. 233 फूट उंचीची ही प्राचीन बुद्ध मूर्ती चीनचा ऐतिहासिक वारसा आहे. यंदाच्या पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं आहे. जे मुळात जमिनीपासून कित्येक फूट उंचावर आहे. चीनमधल्या मागच्या दोन पिढ्यांनी असं दृश्यं पाहिलं नव्हतं. शेती आणि घरं गिळल्यानंतर चीनमधला महापूर आता ऐतिहासिक वास्तूंसाठी संकट बनला आहे. चीनचं नाही, तर खुद्द युनेस्कोनंसुद्धा चीनमधल्या पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे. (China Floods water is crashing on Feet of Buddha Statue)
चीनमधले असंख्य पूल असे कचऱ्यासारखे वाहून गेले आहेत. उंच टेकड्यांवरुन येणाऱ्या पाण्यानं अनेक शहरं बुडवली आहेत. डोंगरावरुन येणाऱ्या पाणी काय तांडव करतंय, ते हे दृश्यं पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. अनेक गाड्या वाहून जातात. बिना ड्रायव्हरच्या गाड्या रस्त्यांवर सरपटत जात आहेत. असंख्य घरं आणि दुकानं पुराच्या पाण्यात तरंगत आहेत.
#China raises flood response to second highest level. pic.twitter.com/y2z9lcBT5j
— Guangming Daily (@Guangming_Daily) August 20, 2020
ही दृश्यं यान शहरातली आहेत. यान नावाच्या एकट्या शहरातून 36 हजार लोकांना हलवावं लागलं. पुराच्या पाण्यानं एका अखंड शहराचं रुपांतर छोट-छोट्या बेटांमध्ये केलं. दुसऱ्या मजल्यावरच्या बाथरुमच्या खिडक्यांमधून लोकांना काढलं गेलं.
छोटी शहरं, महानगरं, सरकारी कार्यालयं आणि ऐतिहासिक ठिकाणं, चीनमध्ये जिकडे बघाल तिकडे फक्त आणि फक्त पुराचंच साम्राज्य पसरलं आहे.
ज्या भागातून पाणी ओसरलंय, तिथल्या घरांची अवस्था एखाद्या स्फोटाहून भीषण बनली आहे. घरात गारा साचलाय, झाडं पडली आहेत. म्हणून पूर ओसरल्यानंतर सुद्धा चीनवर अनेक गल्ल्या आणि छोटी गावं पुन्हा वसवण्याची वेळ आली आहे. (China Floods water is crashing on Feet of Buddha Statue)
संकटांची ही मालिका इथंच संपत नाही. चीनमधला सारा महापूर एकीकडे आहे आणि हे महाकाय धरण एकीकडे. यांग्जे नदीला आलेल्या महापुरानं पुन्हा चीनचं थ्री जॉर्ज धरण चर्चेत आलंय. कारण, ज्या नदीवर हे धरण उभं आहे, त्याच यांग्जे नदीला इतिहासातील सर्वात मोठा पूर आला आहे. म्हणून धरण फुटण्याची भीती पुन्हा गडद होते आहे.
मागच्या आठवड्यापर्यंत या धरणाचे फक्त 7 दरवाजे उघडले होते. मात्र पाण्याचा जोर वाढल्यामुळे आता एकूण 10 दरवाजे उघडले गेले. हे धरण जर फुटलं, तर चीनमधल्या महापुराची ही विनाशकारी दृश्यं या धरणफुटीपुढे शुल्लक ठरतील. कारण, हे जगातलं सर्वात मोठं धरण आहे.
या धरणापासून वुहान शहर 381 किलोमीटर दूर आहे. तरी सुद्धा वुहानमधल्या पुरासाठी हेच धरण कारणीभूत होतं. म्हणजे या धरणाचं बॅकवॉटर साडे तीनशे किलोमीटरवरच्या शहराला पाण्यात बुडवू शकतं. तर हे संपूर्ण धरणातलं पाणी काय प्रलय आणेल, याचा विचार न केलेलाच बरा… (China Floods water is crashing on Feet of Buddha Statue)
संबंधित बातम्या :
चीनमध्ये रातोरात कोरोना रुग्णांची वाढ, 90 टक्के लोकांच्या खाण्यात फ्रोजन चिकनचा समावेश
किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश, रासायनिक शस्त्रांची कुंडली समोर