नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील तणाव जून महिन्यापासून वाढला आहे. आता चीनने भारताची चिंता वाढवणारा प्रकल्प हाती घेतला आहे. भारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यारलुंग जंगबो(ब्रह्मपुत्रा ) नदीवर मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणीला आगामी काळात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा भारतीय जल सुरक्षेवर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये तिबेटी भाषेत यारलुंग जंगबो म्हटलं जाते. (China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)
चीनमधील ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 2021 ते 2025 या 14 व्या पंचवार्षिक योजनेत यारलुंग जंगबो नदीवर धरण बांधण्याचा विचार करत आहे. तिबेटमध्ये या धरणाची निर्मिती करण्याचा चीनचा मानस आहे. ग्लोबल टाईम्सनं पॉवर कंस्ट्रक्शन ऑफ चायनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीन ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली आहे.
ब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात महत्वाची नदी आहे, ही नदी चीन भारत आणि बांग्लादेशमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. पॉवर कन्सट्रक्शन कॉर्प ऑफ चायनाच्या चेअरमनने मागील आठवड्यात एका परिषदेत चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले. (China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)
चीननं तिबेटवर स्वामित्व दावा केला आहे. या भागात दक्षिण आशियातील प्रमुख सात नद्यांची उगमस्थान आहेत. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावदी,सल्वेन यांग्त्जी आणि मँकाँग या नद्यांच्या उगमस्थानवर चीनचं नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.
ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन भारत आणि बांग्लादेशातून वाहते. त्यामुळे दोन्ही देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, चीननं भारत आणि बांग्लादेशवर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान,भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जून महिन्यात लडाख जवळील गलवान खोऱ्यात तणाव झटापट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून पँगाँग सरोवरच्या पश्चिम भागात घुसखोरी करून ठिय्या मांडून बसलेल्या चीनने अखेर या परिसरातून आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली होती. पँगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घेऊन जाण्यास चीनने तयार असल्याचे स्पष्ट केले होते.
Photos : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियोत ऑलम्पिकचं आयोजन, प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय बाकीhttps://t.co/fafr7aCrTh#Olympic #Tokyo #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2020
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव
भारत-चीन तणाव कायम, वाद निवळण्यासाठी 6 नोव्हेंबरला आठवी बैठक
(China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)