नवी दिल्ली : भारत सरकानं चीन सोबत असलेल्या सीमेवर 44 पुलांच्या कामाला सुरूवात केली आहे. चीनशी सीमेला लागून असलेली 7 राज्य आणि लडाख या केंद्रशासीत प्रदेशात पुलांचं काम करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी या कामांचं उद्घाटन केले. सीमाभागात भारत करत असलेल्या कामांमुळे चीनचा जळफळाट झाला आहे. आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताच्या या कामांचा विरोध करत असल्याचं जाहीर केलं आहे. (Zhao Lijian called border infrastructure development “the root cause for the tension between the two sides”. )
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 15 जूनला लडाखमधील गलवान खोऱ्यात झटापट झाली होती. त्यानंतर LAC वर तणाव वाढला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा सुरू आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सीमेवर असणाऱ्या स्थितीमध्ये कोणत्याही बाजूनं हालचालं करु नये, असे म्हटले. सीमा भागात सुरू असलेली कामं हे दोन्ही देशांमधील तणावांचं कारण असल्याचं झाओ लिजियान यांनी म्हटलं. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश करणं मान्य नसल्याचं झाओ लिजीयान यानं म्हटलं आहे.
The inauguration of 44 bridges today will improve connectivity in the far flung areas of Western, Northern and North East sectors and fulfill the aspirations of local people.
They would also meet the transport and logistics requirements of the armed forces throughout the year.— Rajnath Singh (@rajnathsingh) October 12, 2020
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केलेल्या 44 पुलांचे काम अरुणाचल प्रदेश ते लडाखमध्ये चीन सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
चीनकडून सीमारेषेवर जोरदार हालचाली; रुग्णालय, हेलिपॅड आणि शस्त्रसाठ्याची जमवाजमव
पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी
(Zhao Lijian called border infrastructure development “the root cause for the tension between the two sides”. )