बीजिंग: चीनच्या वैज्ञानिकांनी सुपर कम्प्युटरपेक्षा वेगाने काम करणारा संगणक (Quantum Computer) तयार केल्याचा दावा केला आहे. आम्ही जगातील पहिला पहिला लाइट बेस्ड क्वांटम कम्प्युटर तयार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा संगणक सध्याच्या सुपर कम्प्युटरपेक्षा (Super Computer) अब्जावधी पटीने वेगाने काम करु शकतो, असे चिनी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. (world’s first light based quantum computer)
चिनी शास्त्रज्ञांनी या संगणकाचे नाव ‘जियुझांग’ असे ठेवले आहे. ‘जियुझांग’ हे चीनच्या प्राचीन गणितीय ग्रंथाचे नाव आहे. ‘जियुझांग’ संगणक हा प्रकाशाच्या वेगाने एखादे काम करु शकतो.
या क्वांटम कम्प्युटरचा वेग सामान्य बुद्धीच्या आकलनापलीकडचा असल्याचे सांगितले जाते. मात्र, उदाहरणच द्यायचे झाले तर क्वांटम कम्प्युटर 200 सेकंदात जी आकडेमोड करु शकतो ती आकडेमोड करण्यासाठी ‘फुगाकू’ या सुपर कम्प्युटरला 60 कोटी वर्षेही कमी पडतील. यावरून ‘जियुझांग’ संगणकाच्या वेगाचा अंदाज येऊ शकतो.
चीनच्या दाव्यानुसार या संगणकाची क्षमता जगात सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही सुपर कम्प्युटरच्या आकलनापलीकडची आहे. हा क्वांटम कम्प्युटर गौसियन बोसन (Gaussian Boson) सँपलिंग डिव्हाईसच्या माध्यमातून 76 फोटॉनचा शोध लावू शकतो. ‘जियुझांग’च्या शोधामुळे चीनची क्षमता कितीतरी पटींनी वाढणार आहे. यापूर्वी चीनने क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट लॉन्च केला होता. हा सॅटेलाईट हॅक करणे कोणालाही शक्य नाही.
यापूर्वी 2018 साली चीनने 2000 किमी लांबीच्या क्वांटम कम्युनिकेशन लाइनचे उद्घाटन केले होते. ही लाईन राजधानी बीजिंगपासून आर्थिक मुख्यालय असलेल्या शांघायपर्यंत टाकण्यात आली होती. तर दुसरीकडे गेल्यावर्षी गुगलने 53 क्युबिट क्वांटम संगणक तयार केल्याचा दावा केला होता. मात्र, ‘जियुझांग’च्या तुलनेत हे संगणक कालबाह्य ठरणार आहेत.
चीनकडून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांच्या मोठ्याप्रमाणावर जैविक चाचण्या (biological tests) केल्या जात आहेत. या माध्यमातून चीनला मानवी क्षमता विस्तारलेले आणि सामर्थ्यशाली ‘सुपर सोल्जर्स’ निर्माण करायचे आहेत.
संबंधित बातम्या:
टाटा समूहाचा चीनला दणका, आता मोबाईलचे सर्व भाग भारतातच तयार होणार
अमेरिका आणि सोवियत रशियानंतर आता चीनही चंद्रावरची माती आणणार, नवे खुलासे होण्याची शक्यता
भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’
(world’s first light based quantum computer)