मुंबई : ड्रामा क्वीन कंगना रनौतने पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या करण जोहरवर टीका केली आहे. सिनेसृष्टीची निर्मिती करण जोहर किंवा त्याच्या बापाने केली नाही, असा घणाघात कंगनाने केला आहे. समाजवादी पक्षाचे मीडिया समन्वयक मनिष अग्रवालने केलेल्या ट्विटला प्रत्युतर देताना कंगनाने हे ट्विट केलं आहे. (Cineworld was not made by karan johar or his father)
सिनेसृष्टी फक्त करण जोहर किंवा त्याच्या बापाने बनवली नाही. दादासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार, कर्मचाऱ्यांनी, सैनिकांनी ज्यांनी सीमेचं रक्षण केलं, ज्या नेत्याने संविधानाचं रक्षण केलं, ज्या जनतेने तिकीट खरेदी करुन प्रेक्षकाची भूमिका पार पाडली, या आणि अशा अनेक लोकांनी सिनेसृष्टीची निर्मिती केली, असं कंगना म्हणाली.
इंडस्ट्री सिर्फ़ करण जोहर/उसके पापा ने नहीं बनाई,बाबा साहेब फाल्के से लेकर हर कलाकार और मज़दूर ने बनाई है,उस फ़ौजी ने जिसने सीमाओं को बचाया,उस नेता ने जिसने संविधान की रक्षा की है,उस नागरिक ने जिसने टिकट ख़रीदा और दर्शक का किरदार निभाया,इंडस्ट्री करोड़ों भारतवासीयों ने बनाई है। https://t.co/klkJlqcJ6C
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2020
“तुम्ही संघर्षाला कमी लेखून सर्वांवर टीका करुन प्रगती करु इच्छिता का ? असा सवाल मनिष अग्रवालने कंगनाला विचारला होता. करण जोहर असो किंवा अन्य फिल्मनिर्माते, सर्वांच्या मेहनतीमुळेच सिनेसृष्टी उभी आहे. कोणतंही क्षेत्र हे सर्वांना अपशब्द वापरुन 1-2 दिवसात उभं राहत नाही,” असं ट्विट मनीष अग्रवालने केलं होतं.
@KanganaTeam जी आप सबके संघर्षों को गाली देकर,तुच्छ बताकर,सबके ऊपर निशाना साधकर आगे बढ़ना चाहती हैं? @karanjohar हों या अन्य फ़िल्म निर्माता सभी लोगों की सामूहिक मेहनत से ये भारतीय फिल्म इंडस्ट्री खड़ी हुई है,कोई भी इंडस्ट्री आपकी तरह सबको गाली देकर 1-2 दिन में खड़ी नहीं हो जाती https://t.co/U3Aaxuw2so
— Manish Jagan Agrawal (मनीष जगन अग्रवाल) (@manishjagan) September 15, 2020
कंगनाने मंगळवारी सकाळी जया बच्चन यांचा राज्यसभेतील व्हिडिओ ट्विट करत टीका केली होती. सपा खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहारादरम्यान खासदार रवीकिशन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. रवीकिशन यांच्यावर केलेल्या टीकेवरुन कंगनाने जया बच्चन यांचा समाचार घेतला.
Jaya ji would you say the same thing if in my place it was your daughter Shweta beaten, drugged and molested as a teenage, would you say the same thing if Abhieshek complained about bullying and harassment constantly and found hanging one day? Show compassion for us also ? https://t.co/gazngMu2bA
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2020
काही दिवसांपूर्वी कंगनाने करण जोहरवर ट्विट करत टीका केली होती. “करण जोहर हा सिनेमाफियाचा मुख्य सूत्रधार आहे. करन जोहरने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. यानंतरही करण जोहर बिनबोभाट फिरतोय. करणवर कोणतीही कारवाई केली जात नाही. आमच्या सारख्यांना याठिकाणी संधी आहे का? “, असा सवाल कंगनाने ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन केला होता.
सुशांत सिंह प्रकरणानंतर कंगनाने आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत वक्तव्य करण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये फक्त सिने-अभिनेत्यांच्या मुलांनाच प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप केला होता.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना रनौतने आक्रमक पवित्रा घेतला. कंगनाने करण जोहर, महेश भट्ट आणि आदित्य चोप्रासह अनेकांवर आरोप केला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेनिर्माते आणि प्रोडक्शन हाऊसनी सुशांतचं करियर धुळीस मिळवलं. सुशांतला काम करण्याची संधी दिली नाही. तसेच संधी हिरावून घेतल्याचा आरोपही कंगनाने केला होता.
संबंधित बातम्या
जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट
कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल
कंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत