मुंबई : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने जगभरातील नर्सेसविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. फक्त ‘कोरोना’सारख्या संकटकाळातच नाही, तर कायमच निरपेक्ष वृत्तीने रुग्णाची सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांचे ऋण व्यक्त केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही नर्सेससमोर नतमस्तक झाला. (CM Actors Cricketers Political Leaders tweets on International Nurses Day)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :
जगभर विषाणूचा कहर सुरु असतानाही तुम्ही अनेक रुपात उभ्या आहात. तुमच्या निरपेक्ष आणि सेवाभावामुळेच अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांत परतत आहेत. तमाम परिचारिका माता भगिनींना त्यांच्या त्याग, समर्पण व सेवा व्रतासाठी मानाचा मुजरा. शतश: नमन!
जगभर विषाणूचा कहर सुरू असतानाही तुम्ही अनेक रूपात उभ्या आहात. तुमच्या निरपेक्ष आणि सेवाभावामुळेच अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांत परतत आहेत. तमाम परिचारिका माता भगिनींना त्यांच्या त्याग, समर्पण व सेवा व्रतासाठी मानाचा मुजरा. शतश: नमन!#InternationalNursesDay
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 12, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार :
‘आंतरराष्ट्रीय नर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आमच्या परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील.
Greetings for the ‘International Nurses Day’ today!
Our Nurses are standing shoulder to shoulder with the doctors in this battle against Corona & taking care of the patients, this selfless service of theirs will go down in history & be forever remembered.#InternationalNursesDay pic.twitter.com/MubSYFTNSQ— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 12, 2020
खासदार सुप्रिया सुळे :
जगभरातील परिचारिका कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आज मैदानात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. त्यांचे कर्तव्याप्रती समर्पण व सेवाभाव संपूर्ण जग पाहतंय. त्यांच्या कार्याला सलाम व आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगभरातील परिचारिका कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आज मैदानात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत.त्यांचे कर्तव्याप्रती समर्पण व सेवाभाव संपूर्ण जग पाहतंय.त्यांच्या कार्याला सलाम व आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #NursesDay pic.twitter.com/9ASfhRyhOr
— Supriya Sule (@supriya_sule) May 12, 2020
गृहमंत्री अमित शाह :
जगभरात मानवतेची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. नर्स आमच्या वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहेत. कोविड19 चा प्रसार रोखण्यात असणारी त्यांची भूमिका खरोखर उल्लेखनीय आहे. आमच्या परिचारिकांच्या अथक प्रयत्नांसाठी भारत त्यांना सलाम करतो.
On #InternationalNursesDay, I express my gratitude towards all the nurses serving humanity across the world. Nurses are the backbone of our medical sector. Their role in containing the spread of COVID-19 is truly remarkable. India salutes our nurses for their tireless efforts.
— Amit Shah (@AmitShah) May 12, 2020
कॉंग्रेस नेते राहुल गांधी :
संपूर्ण भारतभर आमच्या परिचारिका अनेकांचे जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत. त्या आमच्या नायिकाच आहेत, ज्यांचा कुठेही गौरव होत नाही. कोविड19 विषाणूविरुद्ध आमच्या संरक्षण फळीत त्या फ्रंटलाईन सोल्जर आहेत.
Across India our nurses are working tirelessly, around the clock, to help save lives. They are our unsung heroes, our first line of defence against the Covid19 virus.
On #InternationalNursesDay I thank & salute each & every one of them for their hard work & dedication.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2020
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
जगभरातील सर्व परिचारिकांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी आजारी आणि गरजूंची काळजी घेत लक्ष पुरवले आहे.
It’s a day to celebrate & thank all the Nurses across the world who’ve been providing care & attention to those unwell & in need.
They’re the silent guardians who make invaluable contributions to the health & safety of people while risking their own lives.#InternationalNursesDay pic.twitter.com/rkMaUmwtkn— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 12, 2020
क्रिकेट कर्णधार विराट कोहली :
अशा आव्हानात्मक वेळी आपल्या निःस्वार्थ सेवा, समर्पण, करुणा आणि दयाळूपणाबद्दल धन्यवाद
Thank you for your selfless service, dedication, compassion and kindness during such challenging times and otherwise. ??? Let us all join together to celebrate #InternationalNursesDay ?⚕️?⚕️
— Virat Kohli (@imVkohli) May 12, 2020