प्रत्येकाने मर्यादा ओळखून बोललं पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

| Updated on: Feb 27, 2024 | 12:18 PM

प्रत्येकाने मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. हे गाव बंद, रस्ता बंद, ही काय भाषा आहे का ? असं कधी याआधी झालं होतं का ? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

प्रत्येकाने मर्यादा ओळखून बोललं पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
Follow us on

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 :  प्रत्येकाने मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं. मी मराठा आंदोलकांना फेस केलं आहे. जरांगे पाटील माझ्याबद्दल बोलले, आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खालच्या पातळीची भाषा वापरली गेली. त्यावर देखील आम्ही आक्षेप नोंदवला. ही मराठा आंदोलनाची भाषा नाही आहे ही राजकीय भाषा आहे असा आरोप त्यांनी . जरांगेंची भाषा राजकीय आहे. हे करा, ते करा, हे गाव बंद, रस्ता बंद, ही काय भाषा आहे का ? जरांगेंच्या तोंडी कोणाची भाषा आहे ? कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, कायदा सर्वांनी पाळला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत कोणी बोलू लागलं तर कोणालाही पाठिशी घालू नये. विरोधकांनी यात राजकारण आणू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं

मराठा समाजालाा 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं आहे.यावेळी सर्व बाबी तपासण्यात आल्या आहेत. स्वतंत्र मराठा आरक्षण दिलंय, सरकारने कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण दिलं आहे. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठ्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले पण ..

इतकी वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही ? इतर कोणत्याही समजाला धक्का न लावता हे आरक्षण आम्ही दिलं आहे. पण हे आरक्षण टिकणार नाही याची चर्चा सुरू झाली. पण हे का टिकणार नाही हे तरी विरोधकांना सांगावं ना.
आरक्षण टिकणार नाही, हे कुठल्या मुद्यावर म्हणता ? असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. मराठ्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, पण त्यांना वंचित ठेवलं गेलं. मराठा समाज हा मागास आहे, हे माहीत असतानाही समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं.

ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार म्हणालो होतो. जे आम्ही बोललो ते करून दाखवलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता पुन्हा एकमताने आरक्षण दिलं आहे, मग आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा,समाजात अस्वस्थता निर्माण करणं हा कोणाचा हेतू आहे का?