मुंबईः प्रशांत दामले (Prashant Damle) हे नाट्य क्षेत्रात ग्रेट आहेत, पण साडेतीन महिन्यांपूर्वी आम्हीही एक महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacketay) यांना अशा प्रकारे टोला लगावला. ते म्हणाले, ‘ 12,500 वा प्रयोग झाला तुमचा. मी तीन साडेतीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटतात. राज्यात, देशात, जगभरात उमटतात. तुमच्यासारखं आम्ही केलंच नं हे…. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
यापूर्वीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत-पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आज भारताने विजय मिळवला, तसा सामना आम्ही तीन महिन्यांपूर्वीच जिंकला होता, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.
रविवारी प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचे 12,500 प्रयोग झाले. यानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात रविवारी मुख्यमंत्री बोलत होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. नेत्यांनी यावेळी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.
राज ठाकरे यांनी यावेळी वक्तव्य केलं, मी,फडणवीस आणि सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का… कारण यापूर्वी आमच्या (मनसेच्या) दीपोत्सवाला आम्ही तिघे एकत्र आलो होतो. लोकांना वाटणार हे आले म्हणजे ते येणार, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात प्रशांत दामले यांच्या अभिनयाचे कौतुक केले. ते म्हणाले, मी जेव्हा लोकांमध्ये जातो. तेव्हा सांगतो, मी तुमच्यातलाच आहे. साडेतीन हजार लोक होते, त्यामुळे त्यांना मी भेटत भेटत आलो.
लोक मला विचारतात, एवढी एनर्जी, क्षमता तुमच्यात कुठून येते. पण प्रशांत दामले… तुमच्यातही एवढी ऊर्जा कशी येते?
रंगमंचावर कलावंत जेव्हा आपली कलाकृती सादर करतो, कलेचा आविष्कार घडवतो, त्यावेळी समोरच्या रसिकांनी दाद दिली तरच कला वृद्धिंगत होते. तसेच आमचेही आहे…
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचीही स्तुती केली.