मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (13 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं (CM Uddhav Thackeray address the State). मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांवर अनेक मुद्दे मांडले. तसेच, आता शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाहीत, त्यामुळे ‘जे विकेल तेच पिकेल’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (CM Uddhav Thackeray address the State)
रेस्टॉरंट आणि मंदिरे टप्प्याटप्प्याने लवकरच सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. येत्या तीन-चार दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्याबाबतची कुठलीही घोषणा केली नाही. तर, जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना पाळाव्या, आपण सुरु करु, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यावर, “कोरोनाच्या संकटात आंदोलन करु नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध, गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलं.
मुंबई लोकल इतक्यात पुन्हा सुरु होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याबाबतही दिवाळीनंतर निर्णय घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. परंतु रेस्टॉरंट आणि जिम सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आग्रही होत्या. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची शक्यताही होती.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई पुण्यासह इतर भागातील कोरोनाची स्थिती, आतापर्यंतच्या उपाययोजना आणि आगामी योजना याविषयी उद्धव ठाकरे माहिती दिली.
दुसरीकडे, कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रकरण ताजे आहे. स्वाभाविकपणे मुख्यमंत्री याबाबत उघड भाष्य करणे टाळतीलच. मात्र एखादा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोला लगावण्याची शक्यताही आहेच. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंवरील व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीविषयी ते काही बोलतात का, याकडेही लक्ष होते. त्यावर “महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला काढून नक्की बोलणार”, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला (CM Uddhav Thackeray address the State).
LIVE UPDATES
LIVETV | शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाहीत, जे विकेल तेच पिकेल, कोणत्या पिकाला कुठे बाजारपेठ आहे, याचा अभ्यास कृषी मंत्रालय करुन शेतकऱ्यांना बियाणे देऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/D2qv4eGIHN @OfficeofUT pic.twitter.com/PYQuUJAuSI
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
LIVETV | राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि व्याधीची माहिती घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/D2qv4eGIHN @OfficeofUT pic.twitter.com/ysqNmoPyUe
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
LIVETV | कोरोना गेला म्हणजे पुन्हा राजकारण सुरु करण्याचे प्रयत्न, महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला काढून नक्की बोलणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/D2qv4eGIHN @OfficeofUT #UddhavThackery pic.twitter.com/vK7Pi8wdZx
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
महत्त्वाच्या घडामोडी #uddhavthackeraylive https://t.co/t85qCvnXsF
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. १३/०९/२०२० रोजी दुपारी १:०० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:00 pm on 13th September, 2020.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 13, 2020
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच : उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार : उद्धव ठाकरे
“तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा”, ‘ठाकरे ब्रॅण्ड’वरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल