पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा (CM Uddhav Thackeray And Ajit Pawar) आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. “अधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, मात्र कृतीत ते कमी पडतात”, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली (CM Uddhav Thackeray And Ajit Pawar).
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या गोंधळवरुन अजित पवार या बैठकीत चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. “मी हे बोलणं योग्य नाही, मात्र जनाची नाहीतर…”, असं म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसमोरच सुनावलं. त्यामुळे कागदी घोडे नचवणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली.
दरम्यान, अजित पवार यांनी या बैठकीत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या कामाचे कौतुकही केलं. तर विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना जबाबदारीची जाणीवही करुन दिली.
पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. तसंच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेऊन लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.@OfficeofUT pic.twitter.com/R6C7C9WwYv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2020
CM Uddhav Thackeray And Ajit Pawar
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनीही अधिकाऱ्यांची शाळा घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन खरी आकडेवारीची माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, बेड यांचा आढावा घ्यावा. आवश्यकता नसताना रुग्णांना बेड दिल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी अहोरात्र काम करुन जम्बो रुग्णालय उभारण्याचे निर्देश या बैठकीत दिले. जम्बो फॅसिलिटी त्वरित निर्माण झाल्यावर समस्या कमी होतील. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कमी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढून देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तर कोरोना अहवाल येण्यासाठी 72 तास लागणं हे गंभीर आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ठरवून दिलेल्या वेळेत अहवाल आले पाहिजे, अशी तंबी दिली. वेळेत अहवाल आल्यास रुग्ण संख्या कमी होईल, असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वार्ड अधिकाऱ्यांना जबाबदारी घेण्याचे आवाहन केलं. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील विधान भवन सभागृहात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक पार पडली. pic.twitter.com/tCzZjP8tB2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2020
CM Uddhav Thackeray And Ajit Pawar
संबंधित बातम्या :