पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सरपंचाच्या कामाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावचे प्रथम नागरिक दत्ता गांजळे यांना राज्याच्या प्रमुखांनी फोन केल्यानंतर अक्षरशः गहिवरुन आले. (CM Uddhav Thackeray calls Pune Sarpanch)
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जास्तीत जास्त सहभाग घेता यावा, म्हणून सरपंच दत्ता गांजळे गेले 28 दिवस आपले घर सोडून ग्रामपंचायतीमध्ये राहत आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला त्यावेळी आई वडिलांनंतर कोणीतरी मायेने चौकशी केल्याचे समाधान त्यांना वाटले.
राज्यात आव्हानांचा डोंगर समोर उभा असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचरसारख्या एका छोट्याशा गावच्या सरपंचाशी बोलल्याने मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरपंच दत्ता गांजळे या दोघांचा संवाद
उद्धव ठाकरे – हॅलो, जय महाराष्ट्र दत्ता, काय चालू आहे तुमच्याकडे?
दत्ता गांजळे – साहेब सगळं व्यवस्थित सुरु आहे. घरपोच डिलिव्हरी सुरु आहे
उद्धव ठाकरे – छान छान, नीट खबरदारी घ्या, एकदम लोकांमध्ये मास्क वगैरे लावून जा
दत्ता गांजळे – होय सर, मास्क आहे कंपल्सरी, 60 हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे, परंतु 2 ते 3 टक्के नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत आहेत. शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांचा वेळोवेळी मार्गदर्शन असतंच
उद्धव ठाकरे – चालतंय, काय लागलं तर सांगा
दत्ता गांजळे – नक्की तुम्ही एवढं करता त्यामुळे आमचं पण कर्तव्य आहे (CM Uddhav Thackeray calls Pune Sarpanch)
उद्धव ठाकरे – आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भरवश्यावर करतो आहोत, माझं काय!
दत्ता गांजळे – ओके साहेब
उद्धव ठाकरे – नीट रहा, नीट रहा
दत्ता गांजळे – हो हो साहेब, तुम्ही पण काळजी घ्या
उद्धव ठाकरे – हो हो, जय महाराष्ट्र
ही बातमी पहिलीत का?
जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजारhttps://t.co/9b5qLWjLSA
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 19, 2020
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये जबरदस्त काम, शेतकऱ्याने पत्नीच्या साथीने 25 फूट विहीर खोदली
(CM Uddhav Thackeray calls Pune Sarpanch)