Marathi News Latest news Cm uddhav thackeray told about interesting phone conversation with sonia gandhi
सोनिया गांधींनी फोनवर विचारलं, आमचे लोक सतावत तर नाहीत ना; उद्धव ठाकरेंच्या उत्तराने हशा
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. | CM Uddhav Thackeray
आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चालले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Follow us on
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा रंजक किस्सा उपस्थितांना सांगितला.
महाविकासआघाडी भक्कम असून मी अधूनमधून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन संपर्कात असतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी मला फोनवर ‘आमचे लोक सतावत तर नाहीत ना’ असा प्रश्न विचारला.
त्यावर मी सोनियाजींना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगलं सहकार्य करतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चालले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार यांच्यासह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले.