CM Uddhav Thackeray Solapur Visit Live | फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा दिल्लीला जावं : मुख्यमंत्री

| Updated on: Oct 19, 2020 | 3:24 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. (CM Uddhav Thackeray Visit flood-affected Solapur district Live Update)

CM Uddhav Thackeray Solapur Visit Live |  फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा दिल्लीला जावं : मुख्यमंत्री
Follow us on

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला

मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरसाठी रवाना झाले. मुंबईवरुन त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूलमंत्री थोरात हे  विमानाने सोलापूरला पोहोचले. तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला गेले. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (CM Uddhav Thackeray visit flood-affected Solapur district Live Update)

?LIVE UPDATE? 

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद” date=”19/10/2020,3:23PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”राजकारणाचा चिखल उडवू नका, राज्याच्या मदतीसाठी एकत्र या : उद्धव ठाकरे ” date=”19/10/2020,3:00PM” class=”svt-cd-green” ] राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये. केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार या पेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=” फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा दिल्लीला जावं : मुख्यमंत्री” date=”19/10/2020,2:54PM” class=”svt-cd-green” ] गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतोय. देवेंद्र फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील. केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील, केंद्रातील सरकार देशाचं आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. मोदींनीही फोन करून मदतीचं आश्वासन दिलं,. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देऊ : मुख्यमंत्री” date=”19/10/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] मी इथे येण्यामागचा उद्देश सर्वांना माहिती आहे.. आपण सर्वजण माझ्या दौऱ्यात सोबत होता, एक गोष्ट नक्की, की असं काही नाही मी इथे पहिल्यांदाच पाहतोय… मी सतत इथल्या यंत्रणेच्या संपर्कात होतो.. पाऊस कसा पडतोय, किती पडतोय याची माहिती घेत होतो… आज आलो होतो, उद्या आणि परवाही येणार आहे.. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त, घरं वाहून गेलेत, ते सर्वजण संकटात आहेत. त्यांना दिलासा आणि धीर देतो आहोत. पण दिलासा म्हणजे नेमकं काय, तर अजिबात काळजी चिंता करु नका, तुम्हाला जे जे आवश्यक आहे, ते ते केल्याशिवाय तुमचं सरकार शांत राहणार नाही. संकट पूर्ण टळलेलं नाही.. हा परतीचा पाऊस किती फटका देईल याचा अंदाज आलेला आहे.. पंचनामे झालेत, पूर्ण आढावा तातडीने घेऊन, प्रत्यक्ष मदत दिली जाईल. तूर्तास जे बांधव माता मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यास सुरुवात केली. कोणी काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही.. सावध राहा, प्राणहानी, जीवितहानी होता कामा नये, तशा सूचना यंत्रणांना दिल्या आहेत.. आढावा घेऊन प्रत्यक्ष जी मदत आहे ती दिली जाईल.. पत्रकारांना जे लक्षात येईल, ते शासनाकडे कळवा, गरजूंना मदत मिळेल. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह ” date=”19/10/2020,2:37PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद” date=”19/10/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ] राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी सोलापूर येथे पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर म्हणजे दुपारी सुमारे 2 च्या दरम्यान प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचे चेक वाटप” date=”19/10/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन” date=”19/10/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ] शेतकरी म्हणाला, 72 वर्षात इतका पाऊस पाहिला नाही, मुख्यमंत्री म्हणाले, संकटाचा डोंगर नक्की पार करु [/svt-event]

[svt-event title=”संकटाचा डोंगर नक्की पार करु” date=”19/10/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] संकटांचे डोंगर नक्की पार करु, शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [/svt-event]

[svt-event title=” हे तुमचं सरकार, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री ” date=”19/10/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] राजकारण करायचं नाही. केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही. येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांचं सरकार , वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”गाफील राहू नका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला ” date=”19/10/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ] अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहे. माहिती घेत आहे.माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही गरज पडल्यास केंद्राला मदत मागू. पाण्याचा अनपेक्षित लोंढा आला. ७० वर्षानंतर प्रचंड पाणी आलं. पूर रेषा लक्षात ठेवून पुनर्वसन करू. अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. गाफिल राहू नका. [/svt-event]

[svt-event title=”मदतीसाठी माहिती गोळा करतोय, अभ्यास करत बसणार नाही : मुख्यमंत्री ” date=”19/10/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ] मदत किती करावी यांची माहिती गोळा करतो आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार हे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचं आणि जनतेचं सरकार. आपत्ती मोठी आहे. धोका कायम आहे. सावध राहा. मुख्यमंत्री रामपूरमध्ये दाखल, घरांच्या नुकसानीची पाहणी. केंद्राने राज्याची देणी वेळेत द्यावी. देणी दिली तर मदत मागावी लागणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [/svt-event]

[svt-event title=”पंचनाम्यांबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होईल – बाळासाहेब थोरात” date=”19/10/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] केंद्राकडून आम्हाला अपेक्षा आहेतच, ते मदत करतील ही अपेक्षा आहे. पंचनाम्यांबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होईल – बाळासाहेब थोरात [/svt-event]

[svt-event title=”सरकारला डिफेन्ड करणं एव्हढंच पवारांचं काम : देवेंद्र फडणवीस ” date=”19/10/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांना या सरकारला डिफेन्ड करावं लागतंय, त्यांना डिफेंड करणं एवढंच काम पवारांचं आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर आनेक पालकमंत्री आपआपल्या मतदार संघात गेले – देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील 21 नेते शेतकऱ्यांच्या बांधावर” date=”19/10/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बोरी नदीच्या पुलावरुन नुकसानीची पाहणी ” date=”19/10/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांसोबत बाळासाहेब थोरातही दौऱ्यावर” date=”19/10/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही सोलापूर जिल्हा पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर, मुख्यमंत्री समवेत मुंबईतून महसूल मंत्री थोरातही सोलापूर दौऱ्यावर [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री सांगवीच्या दिशेने” date=”19/10/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगवीच्या दिशेने [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, मातोश्रीहून रवाना” date=”19/10/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही मिनिटांपूर्वी मातोश्रीहून सोलापूरसाठी रवाना, सकाळी 9 वाजता सोलापुरात दाखल होणार [/svt-event]

  • मुंबई पोलिसांचे स्पेशल कमांडो मातोश्रीवर दाखल
  • सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचणार, थोड्याच वेळात मुख्यमंत्री मातोश्रीवरुन सोलापूरसाठी रवाना होणार
  • राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणार
  • अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

(CM Uddhav Thackeray visit flood-affected Solapur district Live Update)

उद्धव ठाकरे हे आज सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

  • सकाळी 09:00 वाजता – सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
  • सकाळी 09:30 वाजता – सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे),
  • सकाळी 10:45 वा – सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
  • सकाळी 11:00 वाजता  – सांगवी पूलाकडे प्रयाण, बोरी नदीची आणि पूरग्रस्त भागाची पाहणी
  • सकाळी 11:15 वाजता – अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी 11:30 वाजता अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी
  • सकाळी 11:45 वा – अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण
  • दुपारी 12:00 वाजता – रामपूर येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
  • दुपारी 12:15 वाजता – रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण
  • दुपारी 12:30 वाजता – बोरी उमरगे येथे आगमन, आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
  • दुपारी 12:45 वाजता – बोरी उमरगे येथून सोलापूरकडे प्रयाण
  • दुपारी 03:00 वा – पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, अभ्यागतांच्या भेटी, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन आणि मुंबईकडे प्रयाण

सोलापूरनंतर मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray Visit flood-affected Solapur district Live Update)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार