मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देतील (CM Uddhav Thackeray Visit To Amravati And Aurangabad).
मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या महामार्गाचं काम उत्तम पद्धतीने सुरु अस्लयाचं समाधान व्यक्त केलं. तसेच, येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार असल्याचीही माहिती दिली. यानंतर आता मुख्यमंत्री औरंगाबादेतील समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत
हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
LIVE
[svt-event date=”05/12/2020,3:45PM” class=”svt-cd-green” ]
CM Uddhav Balasaheb Thackeray visited Shivni (Rasulpur) in Amravati District to inspect the progress of the HinduHriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway.
Speaking to the media on the inspection site, CM Uddhav Balasaheb Thackeray said; pic.twitter.com/OQmhi0mNmP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 5, 2020
[svt-event title=”मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबादेत दाखल” date=”05/12/2020,1:55PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबादेत दाखल, समृद्धी महामार्गाची करणार पाहणी करमार, गोळवाडी गाव परिसरातली समृद्धी महामार्गाची करणार पाहणी [/svt-event]
[svt-event date=”05/12/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आज अमरावती येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आगमन झाले. pic.twitter.com/GOnavEbqcb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 5, 2020
[svt-event title=”1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार : मुख्यमंत्री” date=”05/12/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] ज्या गतीने काम सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये असं वाटलं होतं की कामात कुटेतरी खंड पडेल, काम थोडं हळूवारपणे होईल, मात्र काळातसुद्धा समृद्धी महारार्गाचं काम सुरु होतं. मला खात्री आहे की येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवास या रस्त्यावरुन करु शकतो. 1 मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होईल. [/svt-event]
[svt-event title=”देशातील सर्वौत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं काम आपण केले : मुख्यमंत्री” date=”05/12/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] आज पहिल्यांदाच मी या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकर समृद्धी महामार्गाची पाहाणी करण्यासाठी आलो आणि इथे अप्रतिम काम सुरु आहे. याच्याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता आहे. जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे की देशातील सर्वौत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं काम आपण केलेलं असेल. [/svt-event]
[svt-event title=”अमरावतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह ” date=”05/12/2020,12:15PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – अमरावतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 @OfficeofUT pic.twitter.com/vIKNTCz5iY
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2020
[svt-event title=”मुख्यमंत्री अमरावतीत पोहोचले” date=”05/12/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ] समृद्धी महामार्गाच्या कामाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमरावतीत पोहोचले [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी अमरावतीला पोहोचतील” date=”05/12/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी अमरावतीला पोहोचतील, मंत्री यशोमती ठाकूर आणि संजय राठोड उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल” date=”05/12/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल, नागपूर विमानतळावरुनच अमरावतीकडे होणार रवाना, समृद्धी महामार्गाची हवाई पाहणी करत अमरावतीला जाणार, समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अमरावती दौऱ्यावर जाणार [/svt-event]
CM Uddhav Thackeray Visit To Amravati And Aurangabad
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. एकूण 710 किलोमीटरच्या या द्रुतगती महामार्गासाठी जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.
120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांतील आणि 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे 60 टक्के काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील फतियाबाद ते वैजापूर तालुक्यातील सुराळ्यापर्यंत 60 टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मे अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अमरावती, औरंगाबाद दौऱ्यावर; समृद्धी महामार्गाची पाहणी करणार https://t.co/L5yxkTyDKz #uddhavThackeray #Maharshtra #Mumbai #Nagpur @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
CM Uddhav Thackeray Visit To Amravati And Aurangabad
संबंधित बातम्या :
Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचं काम जोमात : देवेंद्र फडणवीस