मुंबई : “येत्या दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणं टाळा. प्रदूषण करणारे फटाके टाळा. राज्य सरकार फटाक्यांवर बंदी आणू शकतं, पण स्वत:हून निर्णय घ्या,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. दिवाळीनंतर 15 दिवस महत्वाचे आहेत, त्यामुळे खबरदारी घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधला.(CM Uddhav Thackeray address Maharashtra Today)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व समाजबांधवांनी सण घरात राहून साजरे केले. त्याबद्दल सर्वांचे आभार,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोरोनासंदर्भात राज्य सरकारवर अनेकांनी टीका केली. कोरोनाचा चढ आपण कमी केला आहे. दिल्ली आणि पश्चिमेकडे कोरोनाचा आकडा अजूनही वाढत आहे. दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात. अजून लस आलेली नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“दिवाळी आली आहे, गर्दी वाढत चालली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. अशावेळी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ती विनंती करण्यासाठी आज बोलत आहे. आपण सर्वांनी जिद्द, आत्मविश्वास, शिस्तीने कोरोनाची लाट आटोक्यात आणली.”
“दिल्लीत आकडा वाढत आहे. पाश्चिमात्य देशात आकडा वाढत आहे. प्रदुषणामुळे हा विषाणू आपल्या फुफ्फुसावर परिणाम करतो. प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणं टाळा. प्रदुषण करणारे फटाके टाळा. राज्य सरकार फटाक्यांवर बंदी आणू शकतं, पण स्वत:हून निर्णय घ्या,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके वाजवा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“दिवाळीनंतर 15 दिवस महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी बेफिकीरीने कोरोनाचा विषाणू वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी लढत आहेत. आपण आत्तापर्यंत संयमाने लढाई लढलो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायम मास्क लावणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.”
राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे विविध कामांचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. ०८/११/२०२० रोजी दुपारी १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30 pm on 8th November, 2020.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 8, 2020
(CM Uddhav Thackeray will address Maharashtra Today)
महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते.
लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात अनेक गोष्टी या पूर्णपणे सुरु करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी ही 50 टक्के क्षमतेवर सुरु आहेत. मात्र अजूनही राज्यातील मंदिर, मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल हे अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. यावरुन सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे आज जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री काही मोठी घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल याविषयी उद्धव ठाकरे बोलणार का, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इन्स्टाग्राम – @CMOMaharashtra_ Twitter:
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश : मुख्यमंत्री