उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, योगी आदित्यनाथ सरकारचे आदेश

| Updated on: May 16, 2020 | 7:27 PM

उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath Order migrant Worker) यांनी घेतला आहे. 

उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, योगी आदित्यनाथ सरकारचे आदेश
Follow us on

लखनौ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं (CM Yogi Adityanath Order migrant Worker) आहे. या लॉकडाऊनदरम्यान परराज्यातील मजूर चालत किंवा खाजगी गाड्यांनी घर गाठत आहे. मात्र घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

राज्याच्या सीमा क्षेत्रात अनेक प्रवासी कामगार किंवा मजूर हे येत आहे. ते पायी, बाईक, ट्रक आणि इतर अवैध वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र या सर्वांना यापुढे प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

तसेच जो कोणी अवैध वाहनाने राज्याच्या सीमेवर येतील, त्यांच्या गाड्या तात्काळ जप्त केल्या जातील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ठिकठिकाणच्या पोलिसांनी पायी चालणाऱ्यांना त्या ठिकाणी थांबवा, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यातील मजुरांनी माझे आवाहन आहे की, त्यांनी स्वत: सह आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून असुरक्षित वाहनाने प्रवास करु नका. तसेच संबंधित राज्यातील सरकारने मजुरांच्या सुरक्षित जाण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

त्याशिवाय संबंधित राज्यात अडकलेल्या सर्व मजुरांना ट्रेनने निशुल्क आपापल्या राज्यात पाठवण्यात येत आहे. तसेच ट्रेनने आलेल्या सर्व प्रवाशांना मजूरांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर त्यांचे स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांना सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यात येईल, असेही सांगितले आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 140 वर पोहोचली आहे. तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला (CM Yogi Adityanath Order migrant Worker) आहे.

संबंधित बातम्या : 

उत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू

Railway Reservation Cancelled | 30 जूनपर्यंत आरक्षित सर्व रेल्वे तिकिटे रद्द, विशेष ट्रेन्स मात्र सुरु राहणार