PHOTO | ‘अमृतसर’ ते ‘मुंबई’, कोटींची मालकीण असणाऱ्या कॉमेडियन भारतीचा जीवन प्रवास
भारती सिंग एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. प्रेक्षकांमध्ये ती 'लल्ली' म्हणून प्रसिद्ध आहे. 'द कपिल शर्मा शो' मधील तिची ‘लाल्ली यादव’ ही भूमिका सध्या खूप गाजते आहे.
1 / 6
भारती सिंग एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. प्रेक्षकांमध्ये ती 'लल्ली' म्हणून प्रसिद्ध आहे. 'द कपिल शर्मा शो' मधील तिची ‘लाल्ली यादव’ ही भूमिका सध्या खूप गाजते आहे.
2 / 6
भारतीचा जन्म 3 जुलै 1986 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. लहान असतानाच तिचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर पडली होती. त्यातूनही त्यांनी तिचा खूप प्रेमाने सांभाळ केला.
3 / 6
भारतीने आपले शिक्षण अमृतसर येथून पूर्ण केले आहे. भारतीकडे इतिहास विषयाची पदवी आहे. ती केवळ एक चांगली कॉमेडियनच नाही तर, राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजही आहे. नेमबाजीत तिने सुवर्णपदकही पटकावले आहे.
4 / 6
भारतीने 2017मध्ये लेखक हर्ष लिंबाचीयाशी लग्नगाठ बांधली.
5 / 6
भारतीने आपल्या करिअरची सुरूवात ‘इंडियन लाफ्टर चॅलेंज’पासून केली. त्यानंतर त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’, ‘कॉमेडी सर्कस मॅजिक’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ यासह अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
6 / 6
भरती केवळ एक चांगली कॉमेडियन नाही तर एक चांगली नर्तक देखील आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स बेस्ड रिअॅलिटी शोमध्ये तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली होती.