केस गळती रोखण्यासाठी ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

| Updated on: Oct 11, 2019 | 9:01 PM

आपल्या काही नियमित सवयीमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढ होते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ (Common Cause of Hair Loss) शकते.

केस गळती रोखण्यासाठी या सहा गोष्टींची काळजी घ्या
Follow us on

मुंबई : अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला (Common Cause of Hair Loss) लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ (Common Cause of Hair Loss) शकते.

केस गळती रोखण्यासाठी ‘या’ सवयी बदला

  • दररोज शॅम्पूने केस धुणे

अनेक जण फ्रेश राहण्यासाठी दररोज शॅम्पूने केस धुतात. मात्र दररोज शॅम्पूने केस धुणे तुम्हाला महागात पडू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज शॅम्पूने केस धुतल्याने केस खराब होतात. त्यामुळे एक किंवा दोन दिवसाआड केस धुवावेत.

  • केसांवर केमिकल ट्रिटमेंट

अनेकजण केसाना रंग देणे, ब्लीच करणे, डाय करणे यासारखी केमिकल ट्रिटमेंट केसांवर अवलंबतात. यामुळे केस कमकुवत होऊन ते गळू लागतात. यामुळे केसांवर अशाप्रकारची केमिकल ट्रिटमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या.

  • फास्ट फूड खाणे टाळा

तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.

  • केस विंचरणे

केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.

  • गोळ्यांचे अतिसेवन

काही जण सर्दी, पडसं, अंगदुखी यासारख्या छोट्या छोट्या दुखण्यासाठी गोळ्या खातात. गोळ्यांच्या अतिसेवन केल्यानेही केस गळतीचे प्रमाण वाढते. तणाव, हृदयासंबंधीचे आजार, उच्च रक्तदाब या गोळ्यांच्या सेवनाने केस गळतीच्या समस्या वाढतात.

  • केसांना तेल न लावणे

दररोज फ्रेश लूकसाठी अनेकजण केसांना तेल लावत नाही. त्यामुळे केस रुक्ष होतात. केस रुक्ष झाल्याने ते कंगव्याने नीट विंचरता येत नाही आणि केस तुटतात. नियमित केस तुटल्याने तुम्हाला हळूहळू टक्कल पडायला लागते. त्यामुळे नियमित तेल लावा.