नवी दिल्ली : काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 17 मे नंतरचं काय नियोजन आहे? लॉकडाऊनच्या कालावधीबाबत काय विचार आहे? असे प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगड, राजस्थानचे मुख्यमंत्री उपस्थित होते. (Sonia Gandhi Questions to Modi Government)
सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, पुदुच्चेरी या चार राज्यांमध्ये कॉंग्रेस सरकार आहे. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचा समावेश असलेले महाविकास आघाडी सरकार आहे.
’17 मेनंतर, काय? आणि 17 मेनंतर, कसे? लॉकडाऊन किती काळ सुरु राहील, हे ठरवण्यासाठी केंद्र सरकार कोणते निकष वापरत आहे? असे प्रश्न सोनिया यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांनी लक्षपूर्वक विचार करण्याची गरज आहे, देशाला लॉकडाऊनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची रणनीती काय आहे? हे प्रश्न विचारायला हवेत, असं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या बैठकीत म्हणाले.
After May 17th, what? and after May 17th, how? What criteria is Govt of India using to judge how long the lockdown is to continue: Congress interim President Sonia Gandhi during Congress Chief Ministers’ meeting. #COVID19 pic.twitter.com/B7gDV9X2lB
— ANI (@ANI) May 6, 2020
लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या देशभरातील स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर कॉंग्रेसने हे जाहीर केलं होतं. त्यानंतर केंद्राने आपण मजुरांच्या प्रवासाचा 85 टक्के भार उचलत असल्याचा दावा केला होता.
लॉकडाऊनच्या काळात काँग्रेसच्या मोदी सरकारकडे मागण्या :
गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी
सरकारने 2 वर्षे जाहिराती बंद कराव्यात आणि तो पैसा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी वापरावा : सोनिया गांधी
पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र
नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी आणि मजुरांचं नुकसान, सोनिया गांधी मोदी सरकारवर भडकल्या
(Sonia Gandhi Questions to Modi Government)